शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणामुळे लहानआर्वीच्या मागण्या मंजूर

By admin | Updated: June 19, 2014 00:12 IST

लहानआर्वी ग्रा़पं़ हद्दीतील अनेक समस्या धूळखात पडून होत्या. याविरूद्ध सरपंच सुनील साबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले़ या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाल्याने प्रशासन जागे झाले़

दूरसंचारच्या अभियंत्याला घेराव : अनेक कामांचा मार्ग मोकळाआष्टी (श़) : लहानआर्वी ग्रा़पं़ हद्दीतील अनेक समस्या धूळखात पडून होत्या. याविरूद्ध सरपंच सुनील साबळे यांनी आमरण उपोषण सुरू केले़ या उपोषणात संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाल्याने प्रशासन जागे झाले़ अखेर बुधवारी आ़ दादाराव केचे यांच्यासह सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात येऊन मागण्या मंजूर केल्या़ यामुळे उपोषणाची सांगता करण्यात आली़चार हजार लोकसंख्येच्या गावात बीएसएनएलचे टॉवर नाही. यामुळे गावातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प आहे. याबाबत दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिलीत; पण दखल घेतली नाही. यामुळे आमरण उपोषण करताना टॉवरच्या मागणीला प्राधान्य देण्यात आले़ गावात टॉवर मंजूर होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. कर्मचारी अभियंता नंबोदरी गावात येताच त्यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. उडवाउडवीची उत्तरे देत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला; पण ग्रामस्थ संतप्त झाले. सर्वांनी कार्यकारी अभियंत्याला झाडाला बांधण्याचे ठरविले. धास्तावलेल्या अभियंत्याने ३ महिन्यात टॉवरची उभारणी करण्याचे लेखी पत्र दिले. पावसाळ्याचे दिवस असल्याने एवढ्या दिवसात टॉवर उभारणे शक्य नाही म्हणून ग्रामस्थांनी आणखी तीन महिन्यांची अधिक मुदत दिली. सहा महिन्यांत टॉवर न झाल्यास कार्यकारी अभियंत्याच्या वर्धा कार्यालयात आमरण उपोषण करण्याचा निर्णय सरपंच साबळे यांनी व्यक्त केला. पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करून भाड्याच्या घरात सुरू करणार व नंतर इमारत बांधणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. वानखेडे यांनी दिली. आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अ‍ॅलोपॅथी दवाखाना मंजूर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.आर. चव्हाण यांनी लेखी दिली. यामुळे ग्रामस्थांना त्वरित आरोग्यसेवा मिळणार आहे. लहानआर्वी-अंतोरा रोडवरील वाघाडी नाल्यावर पूल बांधकामाचे इस्टीमेट तयार करून प्रस्ताव पाठविल्याची माहिती सा़बां़ विभागाचे उपविभागीय अभियंता नरेश लभाने यांनी लेखी दिली. आष्टी-मोर्शी रोडवरील लहानआर्वी येथील श्रीराम मंदिर ते सुजातपूर-विठ्ठलापूर (पोरगव्हाण) कडे गेलेली पांदण वनविभागाच्या हद्दीत येते. त्यासाठी १.४० मीटरची जागा वनविभागाने ग्रा़पं़ ला सुपूर्द केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.व्ही. तळणीकर यांनी दिली. पांदण रस्ता कामासाठी २१ लाखांचे इस्टीमेट तांत्रिक मंजुरीसाठी जि.प. बांधकाम उपविभागाला पाठविल्याचे सांगितले. लहानआर्वी-जैतापूर रस्त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ़ केचे यांनी दिली. कामाचे टेंडर काढल्याचेही त्यांनी सांगितले़ गारपीटग्रस्तांना मदत वाटपात भेदभाव केला़ याचा सरपंच साबळे, आ़ केचे व ग्रामस्थांनी निषेध करून कारवाईचा ठराव घेतला. सर्व मागण्या लेखी स्वरुपात मंजूर झाल्याने निंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.(प्रतिनिधी)