शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:07 IST

गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली.

गहाण खतासाठी खर्चिक प्रक्रिया अडचणीचीरोहणा : गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली. यामुळे परिसरातील कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरण्या साधल्या आहेत. याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असले तरी कर्जाचे पुनर्गठन व त्यातील शेती गहाण करून देण्याची खर्चिक प्रक्रिया यामुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले नाही. परिणामी, बँकाच्या दिशेने होणारी पायपीट सुरूच आहे.पेरण्या साधल्या तर उत्पन्नही चांगले येते, या अनुभवामुळे शेतकऱ्यांत उत्साह दिसतो. पेरण्या साधल्या तरी खते व किटकनाशके यांची व्यवस्था व मजुरांची मजुरी देण्यासाइी शेतकऱ्यांना बँक कर्जाची मोठी गरज असते. एक वर्षाच्या थकित कर्जाचेच पुनर्गठण होईल, त्यापेक्षा अधिक वर्षाच्या थकित कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, ही अट अडसर ठरत आहे. एक लाखापेक्षा अधिक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन गहाण करून देणे अनिवार्य आहे. यासाठी खर्च अधिक व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. हा खर्च २० हजार रुपयांपर्यंत जात असल्याने अनेक शेतकऱ्यांची नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था बँकेने केली. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिणामी, अद्याप बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केही पूर्ण झाले नाही. केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले. उर्वरित शेतकरी कर्जापासून वंचित आहेत. पीक कर्ज वाटपासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असले तरी बँकांमध्ये कर्ज वाटपाबाबत असलेली उदासिनता शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे. यामुळे किती शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्नच अनुत्तरीत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत बँकांना निर्देश द्यावे व शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)