शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती, हमीभावासाठी गुरूवारपासून शेतकरी संपावर

By admin | Updated: June 1, 2017 00:32 IST

शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्यांसाठी राज्यभरातील

सभेतील निर्णय : सहभागाकडे सर्वांचे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट/समुद्रपूर : शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा एवढा हमीभाव द्या, संपूर्ण कर्जमुक्ती करा या मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकरी १ जूनपासून संपावर जात आहे. संपात जिल्ह्यातील शेतकरीही सहभागी होत आहे. सोमवारी दुपारी आमदार निवास नागपूर येथे झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. किसान क्रांती, शेतकरी संघटना, प्रोग्रेसिव्ह फार्मस् व शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या इतर संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. यात ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे १ जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जात आहे. संप मागण्या पूर्ण होईस्तोवर चालणार आहे. शेतकरी संपावर जाणार म्हणजे शेतीची कामे बंद करणार, असे नव्हे तर जागृती करून स्वत: पूरते पिकवावे, बाजारात माल विकू नये, शेतात कापूस व इतर रोख पिके घ्यावी, अन्न-धान्याचा पेरा कमी करून तुटवडा निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. संपाद्वारे शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, समृद्धी मार्गाचा प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत डांबरी रस्ते करा, फळभाज्यांनाही हमीभाव देत खरेदी करा, दुधाचे भाव ५० रुपये करा आदी मागण्या लावून धरण्यात येत आहे. संप काळात सभा, मेळावे, बैठका घेत गरजेपेक्षा अधिक अन्न-धान्याची पेरणी करू नये, बाजारात विकू नये याबाबत जनजागृती केली जाणार आहे. गावात राहून धरणे, उपोषण केले जाणार आहे. या आंदोलनाला ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे. बैठकीला माजी आमदार सरोज काशीकर, मधुसूदन हरणे, शैलेजा देशपांडे, सतीश दाणी, निळकंठ घवघवे, उल्हास कोटंबकर, जीवन गुरनूले साहेब येंडे, गणेश माथनकर, सुनील हिवसे, शंकर घुमडे, चंद्रमणी भगत, माजी जि.प. सदस्य गजानन निकम, जि.प. सदस्य ज्योती निकम, माजी जि.प. सदस्य रेखा हरणे, सुनंदा तुपकर, प्रकाश सेनाड, प्रकाश रोकडे, अंकुश चेले आदी उपस्थित होते.