शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आगीत शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2015 02:19 IST

येथील गौरक्षण परिसरातील शेतकरी कमलाकर शंकर खोटोळे यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली.

पुलगाव : येथील गौरक्षण परिसरातील शेतकरी कमलाकर शंकर खोटोळे यांच्या मालकीच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या भीषण आगीत गोठ्यात बांधलेला एक बैल व दोन गोऱ्ह्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर सहा गाई गंभीररित्या होरपळल्या. त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करीत आहेत. या आगीत शेतीच्या साहित्यासह पाच लाख रुपयांचे साहित्य खाक झाले. शहर झोपेत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास गोठ्याला आग लागली. रात्री वारा असल्यामुळे आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. गुरांच्या हंबरड्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले असता आगीची घटना उघड झाली. घटनेची माहिती लगेच पोलीस प्रशानाला देण्यात आली. यात नगरपरिषद व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यातही केंद्रीय दारूगोळा भांडाराचे अग्निशामन दल विलंबाने घटनास्थळी पोहचले. अग्निशामन दल पोहचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत तीन जनावरे आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. या आगीत शेतीची अवजारे, स्प्रिंकलर पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले. सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त व कर्जबाजारी होत आहेत. अश्यातच खोटोळे यांच्यावर आलेल्या या सकंटामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्यांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे. जि.प.च्या कृषी व पशुसंवर्धन सभापती श्यामलता अग्रवाल व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या समक्ष पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. यात सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नाविण्यपूर्ण योजनेतून मदत करण्याची ग्वाहीही अग्रवाल यांनी दिली.(तालुका प्रतिनिधी)