शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट

By admin | Updated: July 22, 2015 02:45 IST

रसुलाबाद व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळाले नाही.

प्रहारचे अभिनव आंदोलन : रसुलाबादचे शेतकरी लाल्याच्या अनुदानासह नैसर्गिक आपत्ती मदतीपासूनही वंचितआर्वी : रसुलाबाद व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना शेतीपयोगी साहित्य भेट करण्यात आले. प्रहारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या या अभिनव आंदोलनाने महसूल प्रशासनात खळबळ उडाली.गतवर्षी कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार रसुलाबाद येथील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. यानंतर नैसर्गिक आपत्तीचे अनुदान घोषित करण्यात आले. तलाठ्याने कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. यादीत नावे असलेल्या शेकऱ्यांनाही अनुदान मिळाले नाही. गतवर्षी पाऊस न आल्याने रसुलाबाद येथील शेतकरी उत्पन्नास मुकला. शेतकऱ्यांना अनुदान घोषित झाले; पण रसुलाबादच्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कमच मिळाली नाही. या गावातील शेतकरी दरवर्षीच अनुदानापासून वंचित राहत असल्याने शेतकऱ्यांनी प्रहारकडे तक्रार केली. बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार मनोहर चव्हाण यांची सोमवारी भेट घेण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सोबतच पिके डवरण्याकरिता वापरण्यात येणारा लाकडी डवरा, बैलांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या टिनमिन्या, रुमणे, तुतारी, बैलांचे दोर व अन्य शेतीपयोगी साहित्य भेट देण्यात आले. शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. पेरलेले बियाणे उगवले; पण पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली. ती कशी करावी, ही विंवचना असताना शासनाने घोषित केलेले अनुदानही मिळाले नाही. ते त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून अनुदानाची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी त्वरित आणून द्या, मी स्वत: अनुदान का मिळाले नाही, याची चौकशी करून अनुदान देण्याची व्यवस्था करतो, अशी ग्वाही दिली. अनुदान न मिळाल्यास यानंतर आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा जगताप यांच्यासह रसुलाबाद येथील शेतकरी रमेश मांडवगडे, बद्रुद्दीन काजी, गजेंद्र आकडे, नरेश राऊत, प्रभाकर सावरकर, भास्कर देऊळकर, सुमीत्रा लोखंडे, गजानन वर्मा, किशोर टाके, घनश्याम क्षीरसागर, हरदास मेश्राम, लक्ष्मण ढोले, बिसमील्ला खा, विमला टाले, सुरेखा रघाटाटे, नरेश ढोके, युनूस वहीद खा, सैय्यद शमी, अर्थव गुल्हाणे यांच्यासह १०० च्या वर शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला.(तालुका प्रतिनिधी)