शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पाहिजे!

By admin | Updated: January 24, 2016 02:07 IST

चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे.

किशोर तिवारी : शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयावर व्याख्यानहिंगणघाट : चुकीच्या धोरणांमुळे व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रशासकीय व्यवस्थेला लागलेल्या भ्रष्ट्राचाराच्या किडीमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्येच्या गर्तेत सापडला आहे. त्यांच्या जीवावर जगणारे व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाही. तेव्हा जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला पहिजे, असे मत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र शासन विभागाचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. भारतीय युवा सस्कार परिषद आणि भारतीय बहुउद्देशीय युवा संस्कार मंडळ, हिंगणघाटच्या वतीने आयोजित आयोजित व्याख्यानमालेत शेतकरी आत्महत्या एक वास्तव - उपाय व चिंतन या विषयांवर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृउबासचे सभापती तथा नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी होते. उद्घाटक म्हणून पं.स. चे. माजी सभापती वासुदेव गौळकार, परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक डॉ. उषा साजापूरकर, प्रा. डॉ. शरद कुहीकर, संस्कार मंडळाचे सचिव प्रदीप नागपूरकर आदी उपस्थित होते.चुन्नीलाल कटारिया प्राथमिक शाळेत आयोजित व्याख्यानमालेची सुरूवात शेतकरी हल्ल्यात शहीद जवान तथा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त बांधवांना दोन मिनिट मौन श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोठारी यावेळी म्हणाले शेतकरी नसेल तर जगाची आणि शेतीचा कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे शेतकरी कसा सुखी होईल याकडे शासनाने आणि आपण सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे हे आहे. प्रास्ताविक व सर्वांचा परिचय सचिव प्रदीप नागपूरकर यांनी करून दिला. संचालन योगीराज कोहचाडे, यांनी केले. आभार उषा साजापूरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन काळे, गजानन नांदुरकर, मोतीराज मून, रवी धनकर, मनीष हिवंज, गौरव मेश्राम, अशोक येकेश्वर, मोहन वैरागडे, श्रृती कोहचाडे, अर्चना घ्यारे, नैतिक मून, केशव नक्षिणे, डॉ. मिलिंद मुळे, नरेंद्र पोहनकर, गजानन गिरोलकर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)व्यापारी, दलाल कधीच आत्महत्या करीत नाहीबहुतेक उद्योग हे शेतीवर चालतात. असे असतानाही उद्योजक, व्यापारी, दलाल हे कधीच आत्महत्या करीत नाही. पण ज्यांच्या जीवावर हे सर्व जगतात तो मात्र बिकट परिस्थितीत जीवन जगत असून प्रसंगी मरण पत्कारत आहे. प्रशासकीय व्यवस्था आणि राहकीय उसासीनता यामुळे ही परिस्थिती आल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.