शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुटकीच्या पुलावरील कठडे भग्न

By admin | Updated: October 21, 2015 02:22 IST

तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले.

दुरूस्तीची प्रतीक्षा : तुटलेल्या कठड्यांमुळे अपघातांचा धोकावर्धा : तालुक्यातील कुटकी ते तळोदी या दोन गावांच्या मधोमध धाम नदी वाहते. या नदीवर २००९ मध्ये पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर पुलावर कठडेही बसविण्यात आले होते; पण काहीच दिवसांत कठड्यांची दुरवस्था झाली. या कठड्यांची दुरूस्ती गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. वर्धा तालुक्यातील हमदापूर ते सेलू या मार्गावरील कुटकी व तळोदी या दोन गावांच्या मधून धाम नदी वाहते. रहदारी सुलभ व्हावी म्हणून २००९ मध्ये या नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. २ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करून आठ मिटर उंच पुलाची निर्मिती करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पुलाचे काम पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या पुलावरील कठडे सध्या ध्वस्त झाले आहेत. वाहनांच्या धडकांमुळे पुलाचे कठडे तुटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. हमदापूर परिसरातील नागरिक सेलूला जाण्याकरिता कुटकी-तळोदी मार्गाचा अवलंब करतात. यामुळे रहदारी अधिक असते. पावसाळ्यात नदीला पूर असल्यावर या पुलावरून ये-जा करावी लागते. कधी तर पुलावरूनही पाणी वाहत असते. दरम्यान, पुलावरून जर कुणी गेले तर वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी करण्यात आल्या; पण अद्याप पुलाची दुरूस्ती करण्यात आली नसल्याचेच दिसून येते.(कार्यालय प्रतिनिधी)पाईप व अँगल्स वाकलेलेया पुलाला लावलेले पाईप आणि अँगल्स वाकलेल्या स्थितीत आहेत. यामुळे येथे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुलावरील काही भागातील अँगल्स तर बेपत्ता झाले आहेत. काही पाईपही चोरीस गेल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कठड्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.अँगल्स निसटण्याची भीतीपुलाला लावण्यात आलेले काही अँगल्स चोरी गेले. पुलाला नट बोल्टच्या साह्याने अडकून असलेले अँगल्सही निसटण्याच्या बेतात आहेत. काही ठिकाणी पाईपही झुलत आहेत. अँगल्सही पाण्याच्या दिशेने वाकले आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दिवसभर सुरू असते रहदारीकुटकी-तळोगदी या मार्गावर दिवसभर रहदारी सुरू असते. याच मार्गाने सेलू ते हमदापूर वाहतूक होते. हा मार्ग सेलू येथून हमदापूर आणि सेवाग्राम येळे जाण्यासाठी जवळचा आहे. यामुळे अनेक वाहने याच मार्गाने हमदापूर वा सेवाग्रामला जातात. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.बांधकाम विभागाने दखल घेणे गरजेचेहमदापूर ते सेलू हा रहदारीचा मार्ग असल्याने धाम नदीवरील पूल सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याच पुलाचे कठडे तुटलेल्या अवस्थेत आहे. वाकलेले पाईप, अँगल्सही चोरीला जात आहेत. यामुळे रहदारीच धोक्यात आली आहे. या पुलावरून रात्री-बेरात्री वाहतूक होते; पण कठडे भग्न असल्याने रात्री ये-जा करणे कठीण आहे.बांधकाम विभागाने याची दखल घेणे गरजेचे आहेयाबाबत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.