शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

फळांबाबत ग्राहकांमध्ये केवळ गैरसमज

By admin | Updated: May 10, 2015 01:39 IST

डॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात.

पराग मगर वर्धाडॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु बदलते वातावरण आणि वाढती मागणी यामुळे ही फळे रसायनांनी पिकवली जात असावी, असा नागरिकांना समज असतो. यात सत्यता किती हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने वर्धा शहरातील फळाचे मुख्य व्यापारी व वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन तसेच येथील फळे पिकवित असलेल्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापारी सदस्यांनी या प्रक्रियेबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी असलेल्या भावना व्यक्त करीत अतिशय नैसर्गिक पद्धतीने ही फळे पिकविल्या जात असल्याचे सांगितले. वर्धा शहरात इतवारा परिसरात असलेल्या वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून शहरात हंगामी फळांचा पुरवठा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केला जातो. यात मुख्यत्वे पपई, केळी, आंबा, तरबूज अशा फळांचा समावेश असतो. आंब्याचे उत्पादन जिल्ह्यात होत नसल्याने त्याची आयात केली जाते. कच्चा आंबा मागवून तो पिकविला जातो. त्यामुळे तो पिकवताना रसायनांचा वापर केला जात असावा असा सामान्यांचा नेहमीचा समज असतो. परंतु वास्तव वेगळे असून केवळ गैरसमजामुळे आम्ही बदनाम असल्याचे हे व्यापारी सांगतात. फळांना इंजेक्शन कधीच दिले जात नाहीपपई, टरबूज आदी फळे पिकविताना तसेच त्यांना चांगला रंग येण्यासाठी इंजेक्शन टोचले जातात असाही समज नागरिकांमध्ये आहे. वास्तविकता, जर या किंवा कोणत्याही फळाला इंजेक्शन किंवा कुठलीही वस्तू टोचल्यास ही फळे दोन ते तीन तासातच खराब होतात. त्यामुळे असे कुठलेही इंजेक्शन दिले जात नसल्याचेही फळव्यापारी सांगतात. पपई, टरबूज आदी फळे ही पिकण्याच्या तयारीत असतानाच शेतकऱ्यांकडून घेतली जातात. उन्हाळ्यात ती लवकरच पिकतात. त्यामुळे ती रसायनाने पिकविण्याचा प्रश्नच नसतो असेही व्यापारी सांगतात. जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधून आंब्याची आयात केली जातो. केवळ बेगमपल्ली आंब्याचीच आयात केली जात आहे. दररोज जवळपास १२ टन आंब्याची आवक होत असते. यातील पाच ते सहा टन आंब्याची विक्री होत असते. आणलेल्या कच्च्या आंब्याची सर्वप्रथम पाहणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस या आंब्याचा गरम जागेत माच घातला जातो. त्यानंतर हे आंबे कॅरेटमध्ये कागद पसरवून त्यामध्ये भरले जातात. यानंतर एका उबदार खोलीत हा आंबा पाच दिवसांसाठी व्यवस्थित झाकून ठेवला जातो. त्यानंतर सहाव्या दिवशी हा आंबा उघडला जातो. त्यानंतर पुन्हा सर्व आंब्यांची एकदा तपासणी करून तो विक्रीसाठी तयार होतो.