शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांत पटसंख्येची घसरण

By admin | Updated: August 5, 2014 23:50 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांतील पटसंख्या दरवर्षी घटत असल्याचे गत काही वर्षांपासून दिसून येत आहे़

विजय माहुरे - घोराडग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांतील पटसंख्या दरवर्षी घटत असल्याचे गत काही वर्षांपासून दिसून येत आहे़ यामुळे पूढील काही वर्षांत या शाळा ओस तर पडणार नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे़सेलू पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या १११ शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत़ या शाळांत गत शैक्षणिक सत्रात ५ हजार ४९१ विद्यार्थी शिक्षण घेत होते़ सध्या सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रात ५ हजार २५२ पटसंख्या आहे. जवळपास २४२ विद्यार्थ्यांनी संख्या घसरली आहे़ शाळेच्या पहिल्या वर्गात विद्यार्थी संख्या कमी झाली असल्याचे निदर्र्शनास येत आहे़ ३० सप्टेंबर ही पदनिर्धारणाची अंतिम तारीख असल्याने विद्यार्थी संख्येत थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे़ असे असले तरी २०० विद्यार्थ्यांनी पटसंख्या कमी होत असल्याने हे शाळा ओस पडण्याचे द्योतकच मानले जात आहे़ १११ शाळांपैकी प्राप्त केलेल्या आकडेवारीनुसार ८ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पटसंख्या आहे़ यात हिवरा, चिंचोली, आलगाव, पिपरी, गोहदा, डोंगरगाव, मेणखत, कामठी या प्राथमिक शाळांचा समावेश आहे़तालुक्यात असलेल्या उच्च श्रेणीच्या शाळा नव्या नियमानुसार प्राथमिक होत आहेत़ उच्च श्रेणी शाळेचा दर्जा हा २०० पेक्षा अधिक पटसंख्या असणाऱ्या शाळांनाच मिळणार असल्याचे सांगितले जात आहे़ शाळांच्या सुसज्ज इमारती, विद्यार्थ्यांना गावातच शिक्षणाची सुविधा मिळत असताना अलीकडे कॉन्व्हेंट संस्कृतीचा पगडा पालकांच्या मनावर घट्ट बसला आहे़ गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांचा कल बदलला आहे़ जि़प़ शाळांनी शिक्षणाचे दालण गाव-खेड्यात खुले केले़ त्या शाळांतून चांगले विद्यार्थीही घडले व ते उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहे़ राजकारण, समाजकारण यात पुढे आहे़ अशा शाळांकडे बदलत्या परिस्थितीमुळे पाठ फिरवावी, हे चिंतनीय आहे़ शिक्षण विभागाने याचा विचार करणेच अगत्याचे ठरत आहे़