शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

शेतांमध्ये तणनाशकाचा अतिवापर

By admin | Updated: August 12, 2014 00:06 IST

मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे.

जमिनीची सुपिकता धोक्यात : मजुरांचा तुटवडा प्रमुख कारणपवनार : मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे. बाजारात मिळणारे ग्लायफोसेट नावाचे तणनाशक स्वस्त असल्यामुळे शेतकरी त्याचा सर्रास वापर करतात. हाय जॅक राऊंड अप, ग्लायसेल या विविध नावाने उपलब्ध असलेल्या या तणनाशकाच्या वापरावर अमेरिकेसारख्या राष्ट्राने बंदी घातली आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आपल्या देशात कृषीविषयक कुठलेही निश्चित धोरण नसल्यामुळे काही बाबींचा अतिरेक होताना दिसतो. भारतीय शेतकरी शास्त्रीय दृष्ट्या अनभिज्ञ असल्यामुळे खर्चात बचत होण्यासाठी तो विविध क्लूप्त्या वापरत असतो. कपाशीसारख्या पिकासाठी हे तणनाशक चालत नसतानासुद्धा गार्ड वापरून सदर पिकामध्ये फवारणी केली जाते. बी. टी. कापूस आल्यामुळे कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पर्यायाने बाजारातील कीटकनाशकाच्या खपावर त्याचा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्यांची हीच नाडी ओळखून तणनाशकाचे संशोधन केले व शेतकऱ्यांमध्ये त्या बाबतीत जागृती करून, त्यांची मानसिकता तयार केली. आजघडीला बाजारात सर्वात जास्त तणनाशक विकली जातात. भविष्यात तणनाशकाच्या अति वापराचा काय परिणाम होईल याचा विचार कुणीही करायला तयार नाही. शासनाने शेतकऱ्यांमध्ये जागृती करून शेतकऱ्यांना याचे दूरगामी परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे. एकीकडे शासन राऊंड अप रेडी बी टी कॉटनला परवानगी नाकारते तर दुसरीकडे तणनाशकाच्या वापरावर मात्र निर्बंध घालत नाही. त्यामुळे कृषी खाते केवळ नावापुरतेच राहिले आहे का असा प्रश्न नागरिक व्यक्त करतात. अनुदानाचे वाटप व नुकसानीचा सर्व्हे करणे एवढेच काम त्यांचेकडे शिल्लक असल्याचे बोलल्या जात आहे. कृषी सहाय्यक कधीच गावामध्ये येताना दिसत नाही. एका कृषी साहाय्यकाकडे १५ ते २० गावे असतात. याचा फायदा घेत तोही कुठल्याच गावात जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या योजनाही सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी सांगितली जाते मात्र पावसाचा एक थेंबही पडत नाही. या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत तणनाशक न वापरण्यावर व्यापक जागृती करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)