शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

वैयक्तिक मान्यतेनंतरही २० शिक्षण सेवकांना मानधन नाही

By admin | Updated: December 30, 2016 00:36 IST

जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना माध्यमिक विभागाच्या...

 विमाशीचा आरोप : शिक्षण संचालकाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वर्धा : जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक शाळेत २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वैयक्तिक मान्यता दिली. मात्र या शिक्षकांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे शिक्षण संचालक पूणे येथील कार्यालयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विमाशीच्याच्यावतीने करण्यात आला आहे. शासनाने माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या करण्यावर ६ सप्टेंबर २०१२ च्या निर्णयाने बंदी घातली. सदरची बंदी घालतांना ज्या शााळांना २ मे २०१२ पूर्वी शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणसेवकांच्या नियुक्त्या करण्यासाठी नाहरकत पत्र दिले, अशा शाळांनी नियुक्त्या करून वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिफारशीसह शासनाकडे पाठविण्यास सांगितले होते. असे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पाठविणे क्रमप्राप्त होते; परंतु अतिरिक्त शिक्षक असल्याकारणाने हे प्रस्ताव प्रलंबित ठेवले. या परवानगीमुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांनी जानेवारी २०१५ मध्ये शिबिर घेवून बरीच प्रकरणे निकाली काढली. त्यात काही प्रस्ताव प्रलंबित ठेवले. ज्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते अशा शिक्षण सेवकांनी वर्र्षभर विविध हालचाली केल्या; परंतु शिक्षण विभाग प्रतिसाद देत नव्हता. यावर शिक्षण संघटनेनी विचारणा केली असता, अतिरिक्त शिक्षक व शासनाची परवानगी नसल्याने मान्यता देता येत नाही असे उत्तर कार्यालयाकडून आले. अखेर जिल्ह्यातील विविध संस्थातील ३० शिक्षण सेवकांनी शासनाकडे रितसर प्रस्ताव दाखल करून शासनाची परवानगी मिळविली. शासनाने या शिक्षणसेवकांना काही अटीवर मान्यता प्रदान करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. शासनाचे आदेश असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तीन-चार महिन्यात जवळपास २० शिक्षणसेवकांना वैयक्तिक मान्यता प्रदान केल्या. सदरर्हु शिक्षणसेवकांना अद्यापही मानधन सुरू झाले नाही. यामुळे विमाशि संघाच्या शिष्टमंडळाने माजी कार्यवाह जी.एस. बावनकर यांच्या मार्गदर्शनात एका पथकाने शिक्षणाधिकारी एल.एस. डुरे यांच्याशी चर्चा केली. चर्चेत सदरचीबाब शिक्षण संचालक यांच्या स्तरावरील असल्याने त्यांच्याकडून परवानगी येईपर्यंत मानधनाचा प्रश्न कायम राहणार असून यावर पाठपुरावा चालू असल्याचे सांगितले. यावेळी असे प्रस्ताव तातडीने शिक्षण संचालकांकडे सादर करावे अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली.(प्रतिनिधी) शिक्षण संचालकांच्या या कृतीवर आश्चर्य शासनाच्या आदेशानेच शिक्षणसेवकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याने त्यांचे मानधन लगेच दुसऱ्या महिन्यापासून सुरू होणे अपेक्षित होते. परंतु शिक्षण संचालकांच्या अयोग्य व चुकीच्या कृतीमुळे सप्टेंबर पासून जोपर्यंत ही सर्व मान्यता प्रकरणे त्यांच्या स्तरावरून तपासल्या जात नाही तोपर्यंत आॅनलाईन वेतनदेयकात मानधनाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिक्षणसेवकांना मानधन मिळणार नाही अशा सूचना असल्याने शिक्षणसेवकांना मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. शिक्षण संचालकाची ही कृती म्हणजे शिक्षणाधिकारी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारी असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वैयक्तीक मान्यता देण्यात आलेल्या शिक्षकांना वेतन मिळण्याकरिता शालार्थ प्रणालीत टाकणे अनिवार्य आहे. याकरिता शिक्षण संचालकांची परवानगी आवश्यक आहे. तसा प्रस्ताव पाठविला आहे. यावर उपसंचालकांची परवानगी मिळताच या शिक्षकांचे वेतन सुरू होईल. हा प्रकार किमान आठ दिवसात निकाली निघेल. - एल.एम. डुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. वर्धा.