शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी

By admin | Updated: July 14, 2017 01:26 IST

प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे.

रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचा नकार येत असल्याने महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. अभियांत्रिकीकरिता असलेल्या केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडला असून वर्धेतील तब्बल ६९ टक्के जागा रिक्त आहेत. हे अंतिम चित्र नसून चौथ्या फेरीनंतर रिक्त जागांचे खरे चित्र समोर येणार आहे. विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये असलेल्या वर्धेची ओळख एज्युकेशन हब म्हणून होत असताना येथे शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे रोवल्या गेली. परिणामी विद्यार्थ्यांचा येथील महाविद्यालयांवरचा विश्वास उडाला. प्रवेशाअभावी वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या घटली. पूर्वी १० महाविद्यालये असलेल्या वर्धेत जुने सात एक नवे असे एकूण आठ महाविद्यालये आहेत. ही आठ महाविद्यालये मिळून केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून एकूण २,३०७ जागा भरावयाच्या आहेत. केवळ अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरींगने दोनच महाविद्यालयाने संस्थेचा कोटा ठेवला असून इतर महाविद्यालयांनी तो जमा केला आहे. एकीकडे तंत्रशिक्षण मंडळाने दिलेल्या जागा रिक्त असताना या व्यवस्थापन कोट्यात कोण प्रवेश घेईल अशी स्थिती आहे. या व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून होत असलेल्या प्रवेशावरच शिष्यवृत्तीचा घोळ कायम आहे. आतापर्यंत एकूण ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तोही निश्चित नसल्याचे चित्र आहे. महाकाली शिक्षण संस्थेचे दुसरे महाविद्यालयही बंद होण्याच्या मार्गावर वर्धेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरींग विद्यार्थ्यांच्या प्रवेशांअभावी बंद पडले आहे. आता याच कारणाने त्यांचे अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या महाविद्यालयात २४० जागा असून केवळ १३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. तर आर्वी येथील आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये १९२ जागा असताना केवळ नऊच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कमी प्रवेश असणाऱ्या महाविद्यालयांची गरज काय ? जिल्ह्यात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत नाही. अनेक महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी संख्येवरून तेथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च निघत असल्याचे दिसून आले आहे. यातही विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात प्रवेश कमी आहे त्याच महाविद्यालयात शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे आहे. इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असलेल्या विविध शाखांपैकी इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या एकूण ३३३ जागा असून केवळ २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याची टक्केवारी केवळ ८ असून ९२ टक्के जागा रिक्त आहेत. यात शंकर प्रसाद अग्निहोत्री महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या ६० जागा असून त्यात केवळ दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओेम अभियांत्रिकी महाविद्यालयात शून्य, सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात एक, दत्ता मेघे ६० पैकी १६, अग्निहोत्री कॉलेज आॅफ अभियांत्रिकीत शुन्य, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.