शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बसमधील राखीव जागांवर अतिक्रमण

By admin | Updated: July 13, 2015 02:15 IST

महामंडळाच्या बसगाड्यात विशिष्ट व्यक्तींसह अपंगाकरिता राखीव जागा निश्चित केल्या आहेत.

दुर्लक्ष : अपंग व्यक्ती सोसतात यातना वर्धा : महामंडळाच्या बसगाड्यात विशिष्ट व्यक्तींसह अपंगाकरिता राखीव जागा निश्चित केल्या आहेत. प्रवासा दरम्यान अपंग व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून प्रारंभीलाच जागा राखीव केली आहे. मात्र या जागेवर प्रवाशांकडून जागा बळकावण्याचा प्रकार होत असल्याचे दिसते. यामुळे प्रवासात अपंग व्यक्तींना त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते. ‘केवळ महिलांसाठी, अपंगांसाठी राखीव’ लिहिलेल्या आसनावर त्यांना बसविण्याचे सौजन्य वाहकाकडून दाखविले जात नसल्याची तक्रार अपंग व्यक्तींनी आगार प्रमुखांकडे केली आहे. यामुळे आरक्षणाचा हेतू साध्य होताना दिसत नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आमदार, खासदार, अपंग, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांकरिता राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. आसनाच्या मागे व खिडकीजवळ सदर जागा राखीव असल्याची सूचना लिहली असते. याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. याची जबाबदारी वाहकांची असते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फलाटावर बस येताच खिडकीतून जागेवर रूमाल, बॅग अशा वस्तू टाकून जागा आरक्षित केली जात असल्याचे प्रकार घडतात. मात्र अपंग व्यक्तींना हे शक्य होत नाही. परिणामी बसमध्ये चढल्यानंतर गर्दीमुळे अपंगांना उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आहे. नियमांच्या अंमलबजावणीची मागणी करण्यात येत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)