शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व ग्रामीण कारागिरांचे सशक्तीकरण आवश्यक

By admin | Updated: April 5, 2017 00:36 IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते.

अभिमन्यू भारतीय : खादी व ग्रामोद्योगाच्या प्रचाराबाबत चर्चा सेवाग्राम : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते. यामुळे शेतकरी सर्वत्र समृद्ध व आनंददायी जीवन जगत होते. शेतकरी व ग्रामीण भाग सुखी तर राष्ट्र सुखी; पण कालांतराने शासन व राजकीय स्तरावर धोरण बदलले. शेती, शेतकरी व ग्रामीण उद्योगांची पिछेहाट झाली. औद्योगिक धोरणामुळे शेती व ग्रामोद्योग लयास गेले. शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या सशक्तीकरणाची वेळ आली. यामुळे प्रत्येकाने खादी व ग्रामद्योगांच्या वस्तूंचा आग्रह धरल्यास ग्रामीण भागाला सुगीचे दिवस येतील, असा विश्वास ‘लोकमत’शी संवाद साधताना अभिमन्यू भारतीय यांनी व्यक्त केला. स्वराज्य अभियानचे कार्यकर्ता असलेले अभिमन्यू शाळा, महाविद्यालयात खादी व ग्रामोद्योगाचा प्रचार, प्रसार करीत आहे. रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. नई तालीम येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय म्हणाले की, देशातील अन्नदाता आर्थिक संकटात सापडला आहे. यातूनच निर्माण विषम अवस्थेमुळे आत्महत्या होत आहे. ग्रामीण रोजगाराची परिस्थितीही गंभीर आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात २० कोटी लोकांना सर्व क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. स्वयंचलित यंत्रामुळे रोजगार कमी व बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यातून राष्ट्रघातक परिस्थिती निर्माण व्हायला लागली. याचे धोके आता शासन व नागरिकांनी ओळखले पाहिजे. मोठी लोकसंख्या, सर्वात मोठी लोकशाही व कृषीप्रधान देशात खादी व ग्रामोद्योगाला चालना दिली तर रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटेल. एवढेच नव्हे तर कापूस ते कपडा या उपक्रमाला यश मिळेल. शेतकऱ्यांनी सूतकताई व छोट्या कापड विणणाऱ्या यंत्राचा उपयोग करावा. यामुळे आत्मनिर्भर होऊन बाजार व्यवस्थेचा धोका टळेल. संपूर्ण परिवार सहभागी असल्याने सुखी, पारिवारिक जीवन जगता करता येईल, असेही अभिमन्यू यांनी सांगितले. या उपक्रमावर १० मिनीटाचा माहितीपटही तयार करण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही अभिमन्यू यांनी सांगितले.(वार्ताहर)