शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

३४ महिन्यांच्या वेतनाकरिता कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 02:29 IST

येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

वर्धा जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेतील प्रकरण वर्धा : येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्याकडून गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. बँकेकडून आॅगस्ट २०१३ ते जून २०१६ पर्यंतचे एकूण ३४ महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची बँकेत काम करण्याची मानसिकता नाही. ३४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक बाजू ढासळल्यामुळे दैनंदिन व्यवहार कसे करावे हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमक्ष उभा ठाकला आहे. परिवारातील व्यक्तीच्या आजारपणात औषधोपचाराचा सुद्धा करून शकत नाही. या सर्व बाबीचा शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला; परंतु कर्मचाऱ्यांच्या या ३४ महिन्यांच्या पगाराबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ढासळली असून बँकेत काम करण्याची मनस्थिती नाही. यामुळे पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचे माहितीपत्रकातून कळविले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)