शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठा खंडित कृषी ग्राहकांना दिलासा

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST

राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत.

कृषी संजीवनी योजना : साडेसहा हजार थकबाकीदारांना लाभवर्धा : राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत. याबाबतचे परिपत्रक संबंधित विभागांना प्राप्त झाले आहे.कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकित रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषी संजीवणी २०१४’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, चालू कृषी ग्राहकांना त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरली तर उर्वरित ५० टक्के मूळ थकित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणला विद्युत कायदा-२००३ कलम - ६५ प्रमाणे रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरुपात अदा करण्यात येणार आहे. तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या कृषी ३१ मार्च २०१४ पर्यंतचे थकित असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरणतर्फे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम ३१ आॅगस्ट व ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के किंवा उर्वरित रक्कम भरता येणार आहे. ५० टक्के मूळ थकबाकी एकरकमी ३१ आॅगस्टपूर्वी भरता येऊ शकते, असा हा निर्णय आहे; मात्र योजनेतील कृषी ग्राहकांना १ एप्रिलनंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे व नियमित भरणा करावी लागणार, अशी अटही घातली आहे. या निर्णयानुसार, ज्या कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा कायम खंडित करण्यात आला आहे. त्यांना मात्र कुठेही सामावून घेण्यात आलेले नव्हते; पण २८ आॅगस्ट रोजी शासनाने अध्यादेश काढून या शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत थकित रकमेपैकी २० टक्के रक्कम जमा करणे आवश्यक होते. हा अवधी निघून गेल्यामुळे आता वीज पुरवठा तात्पूरता व कायम बंद असलेल्या कृषी ग्राहकांना या योजनेत समाविष्ट करण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. सदर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि कसा देता येईल, याबाबत संबंधित कृषी ग्राहक आणि महावितरण बुचकळ्यात पडले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)