शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

By admin | Updated: December 20, 2014 22:45 IST

महाकाळ या गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्री व दुष्परिणामाना कंटाळून गावात सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रीविरोधात

दारू विक्रेते, मद्यपिंना दणका : महिला मंडळ ग्रामस्वरक्षण दलाचा इशारावर्धा : महाकाळ या गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाच्या कार्यकर्त्यांनी अवैध दारूविक्री व दुष्परिणामाना कंटाळून गावात सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. महिलांनी एकत्र येऊन दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारल्याने विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. महाकाळ गावात मोठ्या प्रमाणात दारू निमिर्तीला व दारू विक्रीला जोर आला होता. गावातील युवापिढी दारूच्या आहारी जात आहे. यात काही दहा, बारा वर्षांच्या मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे गावाचे नैतिक अध:पतन होत चालले असून घरा-घरातील शांतता यामुळे भंग पावत चालली आहे. या सर्व परिस्थितीचा येथील मुलांच्या, महिलांच्या आणि विशेष करून मुलींच्या मनावर विपरित परिणाम होत होता. गुंडशाहीचे प्रमाण वाढून चौकामध्ये दारू पिणाऱ्या व्यक्ती शिवीगाळ करण्याचे प्रमाणही वाढले आहे. या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत वर्धा जिल्हा दारू बंदी मोहिमेचे प्रमुख ज्ञानेश्वर येवतकर यांनी महाकाळ गावामध्ये दारू बंदीचा कार्यक्रम घेऊन गावामध्ये सामूहिक दारूबंदीचा संकल्प केला. या संकल्पाला गावातील महिला व ग्रामस्वरक्षण दलाने पुढाकार घेवून सामुहिक दारूबंदीची घोषणा केली. संपुर्ण दारूबंदी व दारू मुक्ती निर्देश २१ डिसेंबरपासून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या तारखेपासून दारूबंदी काटेकोरपणे पाळण्यात येणार आहे. अवैध दारू निमिती तसेचस कोणी पिऊन आढळल्यास त्यावर महिला मंडळ, ग्रामस्वरक्षण दल व पोलीस कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी देण्यात आला. दारूमुळे गावाचा विकास खुंटला आहे. युवा पिढी दारूच्या नादी लागल्याने त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी गावच्या महिलांनी एकजूट होऊन दारुविक्री आणि इतरही अवैध धंद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. या वेळी कार्यक्रमाला निवेदिता निलयम आश्रमचे रवी पंचक्रोशी, अभिमन्य भारतीय, सरपंच आशा महाकाळकर पोलीस पाटील, सविता धोटे, हिरा न्याहरे, वंदना मुंडे, शारदा फुन्ने, मनीषा कांबळे, सोनाबाई, स्मिता न्याहारे, वनमाला धवने, गोडे, नागेश धोटे, विक्रीम सहारे, निव्रती गायकवाड, विलास राऊत, प्रकाश मोहीते व साटोडा दारूबंदी महिला मंडळच्या महिला उपस्थित होत्या.(शहर प्रतिनिधी)