शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

खासदार व आमदारांमध्ये रंगला दुहेरी सामना

By admin | Updated: February 19, 2017 01:48 IST

तालुक्यातील ६ जि.प. गट व १२ पं. स. गणाच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. या भागातील काँग्रेसचे आ. रणजित कांबळे व भाजपाचे खा. रामदास तडस

चुरस : तिरंगी लढतीचे चित्र

हरिदास ढोक   देवळी तालुक्यातील ६ जि.प. गट व १२ पं. स. गणाच्या निवडणुका लक्षवेधी ठरल्या. या भागातील काँग्रेसचे आ. रणजित कांबळे व भाजपाचे खा. रामदास तडस या दोन नेत्यादरम्यानचा हा दुहेरी सामना ठरला. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने हेसुद्धा याच भागातील असल्याने हा तालुका हायटेक ठरला. काहींसाठी ही निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम तर आ. कांबळे यांच्यासाठी संघाचा कानोसा घेणारी होती. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे प्रयत्न होताना दिसला. जि.प. व पं.स. च्या या निवडणुकीत आ. कांबळे हे पक्षाच्या वतीने सोळाण्याचे मालक असल्याचे अनुभवण्यात आले. उमेदवारांच्या चाचपणीपासून तर अखरेच्या क्षणापर्यंत त्यांचे कसब पणाला लागले होते. विधानसभेच्या मागील दोन निवडणुकांत त्यांनी आपली मुंबईवारी ज्या पद्धतीने घडवून आणली. तीच रणनिती या निवडणुकीत पाहण्यात आली. आपल्या उमेदवारांच्या दृष्टीने अडचणीचे वाटणारे नामांकन मागे घेण्याचे कौशल्य दाखविण्यात आले. महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांचा सुद्धा यामध्ये सहभाग राहिला. या सर्व बाबीचा अभाव भाजपा नेतृत्वात जाणवला. भिडी जि.प. व पं.स. मतदार संघात यामुळे सरळ लढत झाली. या गटात भाजपाचे भिसे यांच्यासाठी खा. तडस व काँग्रेसचे वसू यांच्यासाठी आम. कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली. भिडी हा भाग आ. कांबळे यांच्यासाठी महत्वपूर्ण असल्याने सर्वच बाबीचा अवलंब निवडणुकीत बघायला मिळाला. सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असलेल्या गुंजखेडा जि.प. गटात काँग्रेसने अनुसूचित जातीतील भारती ठोंबरे यांना उमेदवारी दिली. मागासवर्गीयांची मते जास्त हे विशेष. बसपाच्या तिखाडे यांचे उमेदवारीमुळे या मतदार गटात रंगत आली. गौळ जि.प. गटात काँगे्रस व भाजपातील लढतीला अपक्षांनी आव्हान दिल्याने चुरस बघायला मिळाली. मतांची विभागणी व क्रॉस वोटींगला अपेक्षित समजून या ठिकाणच्या उमेदवारांनी चांगलाच धसका घेतल्याची चर्चा आहे. अंदोरी जि.प. गटात पाटील समाजाने आपल्या उमेदवाराला उचलून धरल्याचे बोलले जात आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जि.प. सदस्य संजय कामनापुरे व भाजपाच्यावतीने विद्यमान पं.स. सदस्य सचिन कुऱ्हाटकर यांच्यातील लढत चांगलीच गाजल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे.