शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जलयुक्त शिवारच्या धर्तीवर आदर्श गावाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:40 IST

आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते.

ठळक मुद्देराम शिंदे : आदर्श गाव विदर्भ विभागीय कार्यशाळा व आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्श गाव योजना २५ वर्षांपासून सुरू आहे. मात्र एक आदर्श गाव करायला ५ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नाही. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात एकाच वर्षात कामे पूर्ण होतात आणि गाव जलयुक्त म्हणून घोषित केले जाते. याच धर्तीवर आदर्शगावाची कामे गतीने पूर्ण करावीत अशा सूचना जलसंधारण मंत्री तथा आदर्शगाव राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी दिल्यात.आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेची विदर्भस्तरीय विभागीय कार्यशाळा व आढावा बैठक आज सेवाग्राम येथे यात्री निवासमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक कैलास मोते, अमरावतीचे सहसंचालक गवसाने, सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव, माधव कोटस्थाने सेवाग्रामच्या सरपंच रेश्मा जामलेकर उपस्थित होत्या.गाव आदर्श करण्यासाठी येणाºया अडचणींचा आढावा घेऊन अडचणी सोडविण्यासाठी संबंधीत अधिकाºयांना सूचना दिल्या जातील. अडथळा निर्माण करणाºया अधिकाºयांवर कारवाईचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. आदर्शगावासाठी आलेला निधी त्याचवर्षी खर्च करावा. निधी अखर्चित राहणे गावाच्या विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. निधी एक वर्षात खर्च केल्यास निधी वाढवून देण्याची हमी सुद्धा त्यांनी दिली.यावेळी एकनाथ डवले यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून राज्यातून पहिल्या आलेल्या काकडदरा या गावाचा मंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जलयुक्त शिवार योजनेवर आधारीत सिडीचे प्रकाशन, आदर्शगाव मासिकाचे प्रकाशन व पूजा उमरेडकर व कराटेपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविले त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कैलास मोते यांनी तर संचालन उपसंचालक कापसे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर भारती यांनी व्यक्त केले. यावेळी ३१ गावांतील सरपंच, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था आणि अधिकारी उपस्थित होते.२५ वर्षांत २५ गावे आर्दश करू - पोपटराव पवारआदर्श गाव योजनेला १९९२ मध्ये सुरुवात झाली. त्याला २५ वर्ष पूर्ण होत आहे. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाच्या कामावर भर देऊन गावे दुष्काळमुक्त करण्यासोबतच उपजिवीकेसाठी गावांचे स्थलांतर होणार नाही यावर काम व्हावे. २५ वर्षात २५ आदर्श गावे शासनाला दाखवून द्यायची आहेत.पहिल्या दहा गावांमध्ये ५ गावे विदर्भातील आहेत. विदर्भासमोर विदर्भातीलच गावांचे उदाहरण समोर ठेवले तर इतर गावांनाही त्यांची प्रेरणा मिळेल. पाणी जिरवणे, पाणी साठवणे, आणि साठलेल्या पाण्याचा विवेकाने व सामाजिक भान ठेवून उपयोग करणे महत्त्वाचे आहे. या योजनेत वर्धेतील १० गावांची निवड व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.