शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गैरहजर डॉक्टरांवर कारवाईस दिरंगाई

By admin | Updated: June 29, 2016 02:06 IST

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, डॉ. अरविंद भंडारी या दोन्ही डॉक्टरांनी गैरहजर राहून...

नागरिक संतप्त : आरोग्य अधिकाऱ्यांना विसरआष्टी (शहीद) : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.एस. रंगारी, डॉ. अरविंद भंडारी या दोन्ही डॉक्टरांनी गैरहजर राहून वैद्यकीय सेवा व कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता. याला पाच दिवसांचा कालावधी झाला तरी त्यांच्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता अद्यापर्यंत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे कुठलाही अहवाल पाठविण्यात आला नाही. त्यामुळे आरोग्य विभाग या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठलीही सुविधा नाही. औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णाला बाहेरून औषध विकत घ्यावे लागते. शासनाच्या योजना असताना रुग्णांना याचाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथे नियमित वैद्यकीय अधिकारी सेवेच्या नावाखाली सतत गैरहजर राहतात. त्यामुळे विविध प्रकरणातील जखमी तथा अपघातग्रस्तांवर उपचार करण्यास अडथळा निर्माण होतो. अशा कठीण प्रसंगी वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहून साहूर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जा, असा सल्ला देवून मोकळे होतात. या सर्व प्रकरणाच्या तक्रारी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्याकडे गेल्यावर त्यांनी डॉ. रंगारी व डॉ. भंडारी या दोघांच्याही निलंबनाचा प्रस्ताव सीईओंकडे पाठविणार असल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते; मात्र पाच दिवसांचा कालावधी लोटला तरी काहीच कारवाई करण्यात आली नाही. डिएचओ डॉ. चव्हाण यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे कारवाईचा प्रस्ताव अद्याप पाठविता आला नसल्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)