शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९.८० लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्यातही लवकर उत्पन्न येणारे सोयाबीन बियाण्यांची अनेक शेतकरी लागवड करतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ३१ हजार ८८४.२१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली, तर सध्या लवकर उत्पादन येणाऱ्या सोयाबीन पिकाच्या मळणीला शेतकरी गती देत असून, हेक्टरी १० ते १२ पोतींचा उतारा येत आहे. तर उर्वरित सोयाबीन पीक सध्या वेळीच कसे सवंगत त्याची मळणी करता येईल यासाठी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक प्रयत्न करीत आहे. यंदा जिल्ह्यात १९ लाख ८० हजार क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे. पण शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यावर जिल्ह्यात सोयाबीनचे नेमके किती उत्पादन झाले हे स्पष्ट होणार आहे. यंदा आर्वी तालुक्यात ११,०४१ हेक्टर, आष्टीत ८,७४५ हेक्टर, कारंजात १३,१२३ हेक्टर, सेलूत १७,२६१ हेक्टर, देवळीत १९,०१८ हेक्टर, हिंगणघाट तालुक्यात १८,६९३.५५ हेक्टर, समुद्रपूर तालुक्यात २५,८६८.६० हेक्टर तर वर्धा तालुक्यात  १८,१३४.०६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. 

अवघ्या दोन महिन्यात झाली भावात घसरण- ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल दहा हजारांवर पोहोचले होते. पण नंतर केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे सोयाबीनच्या भावात दिवसेंदिवस घसरण येत आहे. हिंगणघाट बाजारपेठेत मंगळवारी साेयाबीनला प्रति क्विंटल ३,००० ते ५,००१ रुपये भाव देण्यात आला.

३ हजार ९५० रुपये हमीभावn सायोबीनची शासकीय खरेदी जिल्ह्यात अजूनही सुरू झाली नसली तरी थोड्या प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहे. यंदा शासनाने सोयाबीनला ३ हजार ९५० रुपये हमीभाव दिला आहे.

पावसाने मोडले कंबरडे- मध्यंतरी जिल्ह्यात उसंत घेत झालेल्या पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब फुटली. यामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. असे असले तरी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.

पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी सोयाबीन सवंगणी तसेच मळणीच्या कामाला गती देत आहेत. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचे समाधानकारक उत्पन्न होईल असे चित्र बघावयास मिळत आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा 

 

टॅग्स :agricultureशेती