शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-बुटीबोरी रस्त्यावर दुभाजकाची गरज

By admin | Updated: June 3, 2017 00:36 IST

रस्ता खराब असो वा चांगला, जडवाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत वर्धा ते बुटीबोरी मार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : रस्ता खराब असो वा चांगला, जडवाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत वर्धा ते बुटीबोरी मार्गावर आजवर अनेक अपघात झाले आहे. भविष्यात या घटना टाळण्यासाठी वर्धा ते बुटीबोरी रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. वर्धा ते बुटीबोरी हा ४५ किमी अंतराचा रस्ता खड्ड्यांतून जातो. त्यामुळे खड्डे चुकविताना अपघात होतात. या मार्गावर दुभाजक नसल्याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन समोरासमोर येऊन अपघात होतो. हाच मार्ग सेलू तालुक्यातील गावांना जोडतो. केळझर, सेलडोह येथूनही मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या कमी अंतराच्या रस्त्यांमुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. नागपूर येथून यवतमाळ, पुसद, उमरखेड लांब पल्ल्याचा मार्ग आहे. बुटीबोरी ते वर्धापर्यंत ट्रक, ट्रॅव्हल्स व कार भरधाव पळतात. वाहने ओव्हरटेक करताना समोरील वाहन भरधाव आल्यास धडक होते. येथे दुभाजकाची निर्मिती केली तर अपघाताच्या कमी होईल. दुचाकी चालकांना अनेकदा मुख्य रस्ता सोडून रस्त्याच्या कडेने वाहन चालवावे लागते. काही भागात रस्ता उंच सखल असतो. रात्रीच्या वेळी तर लख्ख प्रकाशझोमुळे दुचाकी वाहन चालकांना समोरून येणारे वाहन नजरेस पडत नाही. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहे. रस्ते विकास महामंडळाने लक्ष देत रस्त्यावर दुभाजकाची निर्मिती करण्याची गरज व्यक्त होत आहे.