शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राज्यातील कृउबास बरखास्त करा

By admin | Updated: August 27, 2015 02:24 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालकांची निवड होते; पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदान करता येत नाही.

वर्धा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून संचालकांची निवड होते; पण शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदान करता येत नाही. यामुळे बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच नाहीत, हे वास्तव आहे. यात बदल करण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी व बाजार समित्या बरखास्त कराव्या, अशी मागणी म. फुले समता परिषदेने केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी नावडकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.गत ४८ वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्या व राजकीय पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर मलिदा लाटला; पण बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मतदानातून संचालक निवडून देण्याचा अधिकार दिला नाही. प्रचलित कायद्याप्रमाणे बाजार समितीत शेतकऱ्यांचे १५ संचालक आहे; पण त्यांची निवड बाजार समित्यांतील शेतकरी प्रत्यक्ष करीत नाही. त्या परिसरातील कृषी सहकारी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे कार्यकारिणी सदस्य, ग्रा.पं. सदस्य मतदानाने करतात. शिवाय अडते व दलालांचे दोन तर मापारी हमाल यांचे संचालक प्रत्यक्ष अडते, दलाल व हमालांच्या प्रत्यक्ष मतदानातून निवडले जातात. शेतकऱ्यांच्या नावावर निर्माण झालेल्या या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष मतदान करून संचालक निवडण्याचा अधिकार नाही. कृषी सहकारी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था वा ग्रा.पं. सदस्य हे कायद्याने संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही. त्यांनी निवडून दिलेली बाजार समिती ही शेतकऱ्यांची समिती आहे व ती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते, हे सांगणे म्हणजे शेतकरी, कायदा व लोकशाहीची थट्टा करणे होय. यामुळे शेतकरी विरोधी कायद्याने स्थापन सर्व बाजार समित्या बरखास्त कराव्या. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे संचालक निवडण्याचा अधिकार देण्यासाठी कायद्याच्या कलम १३ मध्ये तशी दुरूस्ती करावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, संघटक विनय डहाके व पदाधिकारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)