वर्धा : किसान महासंघाची जिल्हा बैठक घेण्यात आली. यात शेतकऱ्यांशी संबंधित अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर निघोट यांनी ही चर्चा घडवून आणली. यामध्ये देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रातील लॅन्को पॉवर प्रोजेक्टमध्ये स्थानिकांना रोजगार देणे, त्यांची कर्मचारी पदावर नियुक्ती करणे, प्रकल्प ज्यांच्या जमिनीवर उभा झाला आहे. त्यांच्या पाल्यांना कंपनीत रोजगार द्यावा, धरणग्रस्थांना लॅन्कोत संधी आदी मागण्यांवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे को-आॅपरेटिव्ह बॅँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम राष्ट्रीयकृत बॅँकेत पुनर्गठित करावी, भूमी अधिग्रहण कायद्यात निश्चित बदल करावा, तसेच वर्धा जिल्ह्यातील कृषी व इतरही क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून शेतकऱ्यांमार्फतच काही प्रकल्प सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. बैठकीला शेतकरी कामगार परिषदेचे महासचिव रुपचंद्र टोपले, धनराज चांभारे, ज्ञानेश्वर पर्बत, धनराज बालपांडे, ज्योती अमृत, नागोराव पचारे, बबनराव कालोकार, भूषण चांभारे, विक्रम पर्बत, मयूर बेंडे, अमर थुल, सचिन धोटे, विलास निवटे, श्रावन कामडी, कुंडलिक डुकसे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
किसान महासंघाच्या सभेत शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचारमंथन
By admin | Updated: August 5, 2015 02:13 IST