शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांच्या पदावनतीबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा

By admin | Updated: December 20, 2014 22:45 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील १६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदावनती संदर्भात येथील लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विधानभवन नागपूर

वर्धा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील १६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या पदावनती संदर्भात येथील लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने विधानभवन नागपूर येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे यांची उपस्थिती होती. वर्धा जि.प. शाळांमध्ये कार्यरत २६२ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांपैकी १६२ मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या २ जुलै २०१४ च्या एका आदेशापैकी १६२ मुख्याध्यापकांना जिल्हा परिषदेच्या २ जुलै १४ च्या एका आदेशाने पदावनत करून सहाय्यक शिक्षक केले. सदर कार्यवाही शिक्षण सहसंचालक यांच्या २० मे २०१४ च्या पत्रानुसार करण्यात आली होती. या आदेशाविरूद्ध जिल्ह्यातील ६१ मुख्याध्यापकांनी उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने शिक्षक सहसंचालक पुणे व जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशाला १ आॅगस्ट २०१४ रोजी स्थगिती दिली. तेव्हापासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सदर याचिकेमध्ये वर्धा जि. प. कडून अहवाल सादर करण्यात आला व त्यामध्ये आम्ही वरिष्ठाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केल्याचे म्हटले आहे.राज्य शासनाकडून अद्याप उत्तर सादर व्हायचे आहे. या पदावनतीमुळे कार्यरत मुख्याध्यापकांवर अन्याय झाला आहे. प्रत्येक वरिष्ठ प्राथमिक शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापकांची नितांत आवश्यकता असल्याची स्थिती शिक्षणमंत्र्यासमोर मांडण्यात आली. त्यामुळे सर्वच प्राथमिक शाळांना स्वतंत्र उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदाकरिता १५० विद्यार्थी संख्येची अट न ठेवता १ ते ७ व ८ वर्ग असलेल्या उच्च प्राथमिक शाळेला पूर्वीप्रमाणेच विनाअट ते मान्य करीत कार्यरत असलेल्या कोणत्याही उच्च श्रेणी मुख्याध्यापकाला पदावनत करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा वर्धाचे शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान केली.यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लोमेश वऱ्हाडे, पदाधिकारी राजेंद्र सोमनकर, कृष्णा देवकर, पुडलीक पोराटे, युवराज मिस्कीन यांची उपस्थिती होती.(शहर प्रतिनिधी)