शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: October 19, 2016 01:24 IST

शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ...

आजारांच्या प्रमाणात वाढ : प्रत्येक घरी आढळतोय किमान एक रुग्णअरुण फाळके  कारंजा (घा.)शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि व्हायरल फिवरचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक घरी किमान एक रुग्ण आढळून येत आहे. शहरातील दवाखाणे फुल्ल आहेत. डॉक्टरांना सुगीचे दिवस आले असून जनता हवालदिल आहे. नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन वॉर्डातील अनेक रिकाम्या खासगी भूखंडांवर प्लॉट मालकाने बांधकाम केले नाही. ले-आऊटमधील सार्वजनिक कामासाठी सोडण्यात आलेल्या रिकाम्या जागेवर नगर पंचायतने तार कुंपण लावले नसल्याने शेजारचे लोक तेथे कचरा आणून टाकतात. शिल्लक अन्न टाकले जाते. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रिकाम्या भूखंडांवर झाडे, झुडपे, गवत वाढले आहे. परिणामी, साप व इतर किटकांचा तसेच डास व माशांचा प्रार्दूभाव वाढला आहे. घाणीमुळे चिकणगुणिया, डेंग्यु, हिवताप, कावीळ आणि व्हायरल आजारांचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे दिसते.यावर नियंत्रण करण्यासाठी नगर पंचायत व आरोग्य विभागाने नियमीत सामूहिक फवारणी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घरात वरील प्रकारचा किमान एक तरी रुग्ण दिसून येत आहे. एकाला हा आजार झाला की, पूर्ण घर आजाराने ग्रस्त होते. ताप, डोके, हात, पाय दुखणे व सांध्यामध्ये सुज निर्माण होऊन अत्यंत वेदना होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. जवळपास एक आठवडा रुग्ण कुणाच्या उपयोगी पडत नाही. ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. यापूर्वी ग्रा.पं.ने बांधलेल्या नाल्या उघड्या असल्याने डासांचा त्रास अधिक होतो. नगर पंचायतला शासनाने शहर विकास फंड उपलब्ध करून दिला नसल्याने नाल्यांची दुरूस्ती वा नवीन बंद नाल्यांचे बांधकाम वा इतर कामे नगर पंचायत प्रशासनाला करता आली नाही. जिल्ह्यातील इतर तीन नगर पंचायतींना पाच कोटीचा विकास फंड शासनाने उपलब्ध करून दिला; पण कारंजा नगर पंचायतला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. यामुळे शहर विकासाची सर्व कामे ठप्प आहेत.खासगी रिकाम्या भूखंडांवरील गवत, झाडे, केरकचरा काढण्यासाठी नगर पंचायतने संबंधित प्लॉट धारकांना सूचना देत कार्यवाही करावी. शिवाय नगर पंचायत प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या रिकाम्या सार्वजनिक जागांना तारांचे कुंपण करून भूखंड स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात पसरलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविणे आणि औषधांची फवारणी करणेही गरजेचे झाले आहे.