शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विविध ठिकाणी वीज पडून चार बैल ठार

By admin | Updated: June 6, 2017 01:11 IST

रविवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या वादळामुळे कित्येक गावातील घराचे छपरे उडाली ...

समुद्रपूरात छप्पर उडाले : पवनारात घर पडलेलोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर / पवनार : रविवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह आलेल्या वादळामुळे कित्येक गावातील घराचे छपरे उडाली तर शेगाव(गो) परडा, बोथली गावात वीज पडून चार बैल ठार झाले. पवनारातही घर कोसळले. रविवार सायंकाळी मेघगर्जनेसह वादळाला सुरुवात झाली. त्यामध्ये वादळाचा अनेक गावाला फटका बसला तर वीजपडून चार बैल ठार झाले. त्यामध्ये बोथली येथील शेतकरी अनिल धुर्वे यांचे दोन बैल शेतात बांधून असल्याने वीज पडून दोन्ही बैल ठार झाले. परडा येथील शेतकरी मधुकर चंदनखेडे यांचा शेतात बैल बांधून होते. तेथे सुद्धा वीज पडल्याने एक बैल ठार झाला तर एक बैल बचावला. शेगाव(गो.) येथील शेतकरी बापूराव वारलू खिरटकर यांच्या शेतात वीज पडल्याने त्यांचा सुद्धा एक बैल ठार झाला. परडा येथील कित्येक घराच्या टिनाच्या शेडसह छपऱ्या उडाल्याने शेतकरी शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये वासुदेव लोख, भारत गायकवाड, सुभाष महाकाळकर, अनंता महाजन, विष्णु तडस, कैलास शंभरकर, शिवदास घाटुर्ले आदिंचे नुकसान झाले तर पाईकमारी येथील वादळाने कित्येक घराचे नुकसान झाले. वसंतराव दोंदल, मधुकर गुरनुले यांचे मोठे नुकसान झाले. ऐन हंगामात शेतकऱ्याचे बैल ठार झाल्याने त्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. तेव्हा त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आहे. सदर घटनेचा पंचनामा करीत तहसीलदार दीपक करंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला असल्याचे सांगितले.वादळी पावसामुळे घर भुईसपाटपवनार येथे रविवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे येथील अनेकांच्या घरावरची छत, कवेलू उडाल तर काहींचे घर कोसळून नुकसान झाले. या वादळी पावसामध्ये वॉर्ड क्र. ६ येथील कुंदन कळणे यांचे विटा मातीचे राहते घर कोसळले. त्यांनी एक दिवस अगोदरच या घरातून आपले सर्व साहित्य दुसरीकडे हलविले होते. त्यानंतर आज सकाळी ही घटना घडली. या घटनेने घरावरील छत उडून घरामध्ये पाणी शिरले. त्यात त्यांच्या अन्न धान्यांची नासाडी झाली. याच वॉर्डातील गणेश मसराम यांच्या घरावरील कवेलू उडाली व घरात पाणी शिरुन नुकसान झाल्याची घटना घडली.