शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदाराअभावी कामांचा खोळंबा

By admin | Updated: July 1, 2015 02:43 IST

येथील तहसील कार्यालयात गत एक महिन्यापासून तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत.

देवळी : येथील तहसील कार्यालयात गत एक महिन्यापासून तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या संपूर्ण तहसील कार्यालयाचा कार्यभार एम.ए. सोनोने या एकमेव नायब तहसीलदाराकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात विविध कामाकरिता नागरिकांची झुबंड उडत आहे. विविध कामांकरिता तालुक्यातील विद्यार्थी व शेतकऱ्यांना कार्यालयाचे उंबरडे झिजवावे लागत आहे. तहसीलदार नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तहसीलदार म्हणून जितेंद्र कुवर तर नायब तहसीलदार यादव कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर सदर कार्यालय तब्बल २० दिवसांपर्यंत तहसीलदाराविना रामभरोसे ठेवण्यात आले होते. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. झाम न झाल्याने येथे आलेल्यांना महत्वपूर्ण कामाअभावी आर्थिक व मानसीक त्रासाला सामोरे जावे लागले. या कार्यालयात तहसीलदारांव्यतिरिक्त तीन नायब तहसीलदारांची पदभरती आहे. परंतु आजघडीला फक्त एका नायब तहसीलदाराच्या भरवश्यावर संपूर्ण तालुक्याचा गाडा ओढला जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील दैनंदिन कामाव्यतिरीक्त संजय गांधी निराधार व निवडणूकींची कामे खोळंबली आहे. बैठकीअभावी मागील अनेक दिवसापासून संजय गांधी निराधाराची प्रकरणे खोळंबली आहे. पिककर्जाच्या कागदपत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेवून येथील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदारांनी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)