शहरं
Join us  
Trending Stories
1
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
2
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
3
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
4
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
5
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
6
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
7
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
8
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
9
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
10
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
11
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
12
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
13
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
14
सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
15
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
16
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
17
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
18
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
19
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
20
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव

समाजकल्याण विभागाला नियमांच्या चौकटीचा विसर

By admin | Updated: May 13, 2014 23:52 IST

वसतिगृह व्यवस्थापनाशी संगनमत करून नियमांना बगल देत समाजकल्याण विभागाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. या धोरणाने त्रस्त झालेल्या येथील राज्य पुरस्कार

समुद्रपूर : वसतिगृह व्यवस्थापनाशी संगनमत करून नियमांना बगल देत समाजकल्याण विभागाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. या धोरणाने त्रस्त झालेल्या येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकाने समाजकल्याण विभागाला नियमांची चौकट नाही काय, असा समाजकल्याण अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.

आदर्श शिक्षकांचा राज्य पुरस्कार प्राप्त येथील सेवानवृत्त प्राचार्य ईश्‍वर भेंडे यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध होईल या उद्देशाने २५ वर्षांपूर्वी स्वत:ची इमारत प्रभू विश्‍वकर्मा ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेला भाड्याने दिली; पण संस्था चालकाने १५ वर्षांपासून इमारतीचे भाडे दिले नाही. इमारत खाली करून देण्याऐवजी वसतिगृहाच्या नावाखाली ती हडप करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप भेंडे यांनी केला. प्रभू विश्‍वकर्मा ग्रामीण बहुउद्देशीय शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित येथील संत ज्ञानेश्‍वर मुलांचे वसतिगृह मागील दोन वर्षांपासून कुलूपबंद आहे. येथील कर्मचारी अन्यत्र नोकरी करतात. त्यांचे वेतन समाजकल्याण विभागामार्फत दिले जाते. एकच व्यक्ती दोन ठिकाणी नोकरी कशी करू शकतो, काम न करता वेतन देणे म्हणजे ‘नो वर्क नो वेजेस’ नियमाचे उल्लंघन नाही काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दोन वर्षांपूर्वी वसतिगृहातील विद्यार्थ्यांंना निकृष्ट जेवण दिले जाते, असे वृत्त प्रकाशित झाले होते. यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ८ डिसेंबर ११ रोजी वसतिगृहाला भेट देत तपासणी केली. यात अनेक असुविधा, विद्यार्थ्यांचे अत्यल्प प्रमाण, एकही अभिलेखा अद्यावत नसल्याचे आढळले. यावरून समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी वसतिगृहाची मान्यता ७ जुलै १२ च्या आदेशान्वये रद्द केली. याविरूद्ध संस्थाध्यक्षांनी सचिव सामाजिक न्याय मंत्रालय विभाग यांच्याकडे अपील केले. यावर शेवटची संधी संस्थेस देण्यात आली; पण प्रत्यक्षात एकही सुधारणा वा त्रुटीची पूर्तता झाली नाही. २८ ऑगष्ट १३ ला जि. प. समाजकल्याण निरीक्षक आर. जे. महालकर यांनी वसतिगृहाची तपासणी केली. यात विद्यार्थी नसल्याचे व त्रुटींची पूर्तता न केल्याचे आढळले. यानंतर १८ जानेवारी व ५ मार्च १४ रोजी सहायक प्रशासन अधिकारी समाजकल्याण हेमंत भोयर व निरीक्षकांनी भेट दिली. यातही जैसे थे परिस्थिती आढळली.

या भेटींचा अहवाल संचालक समाजकल्याण पुणे व कक्षाधिकारी मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आला. वसतिगृहाची मान्यता रद्द केल्याचे जुनेच आदेश निर्गमित करण्याची परवानगी मागण्यात आली; पण अद्याप कारवाई झाली नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी भेंडे यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)