शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शतकोटी वृक्ष लागवडीसह गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी

By admin | Updated: February 26, 2015 01:20 IST

स्थानिक ग्रामपंचायतीच्या शतकोटी वृक्ष लागवडीसह अन्य कामांत अनियमितता आहे़ या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ ...

आकोली : स्थानिक ग्रामपंचायतीच्या शतकोटी वृक्ष लागवडीसह अन्य कामांत अनियमितता आहे़ या संपूर्ण कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रा़पं़ सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले़ मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीत मजुरांना मस्टरमध्ये नोंद केल्यानुसार मजुरी न देणे, मजुरांच्या नावे खोटे बिल काढणे, झाडे जिवंत नसताना जीवित असल्याचे दाखवून त्यांच्या संगोपनावरचा खर्च दाखवून बिल तयार करणे, पैशाची उचल करणे, रात्रीच्या वेळी नवीन वृक्ष आणून लागवड करणे तसेच झाडांना पाणी देण्याकरिता शेतकऱ्यांच्या नावे खोटे बिल तयार करून पैशाची उचल करणे, शेतकऱ्याला रक्कम न देता ती हडप करणे आदी अनियमितता होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने थातूर-मातूर चौकशीचा बनाव केला़ यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी केली तर डोळे विस्कारेल एवढा मोठा गैरप्रकार वृक्ष लागवडीतून बाहेर येऊ शकतो, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे़१३ व्या वित्त आयोगाची व दलित वस्ती सुधारणेची कामे अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवीदा न काढता मर्जीतील लोकांना कामे देणे, त्यांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांकडे दुर्लक्ष करणे, खोट्या निवीदा दप्तरी नोंदविणे, निविदा धारकाकडे परवाना आहे वा नाही याची शहानिशा न करताच निविदा मंजूर करणे, कामाचा आदेश दिल्यानंतर त्यातील अटीनुसार काम सुरू आहे वा नाही याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणे आदी गैरप्रकार सर्रास सुरू असल्याचेही नमूद आहे़यामुळे शतकोटी वृक्ष लागवड व अन्य विकासात्मक कामांत झालेल्या गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य रजनी दखणे यांनी केली आहे़ या प्रकरणात जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे ग्रामस्थांसह सदस्यांचे लक्ष लागले आहे़(प्रतिनिधी)