शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवा

By admin | Updated: August 12, 2014 00:05 IST

बोंडसुला या गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे करण्यात आली़ यावरून मोजणी झाली

वर्धा : बोंडसुला या गावातील शासकीय जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे़ हे अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे करण्यात आली़ यावरून मोजणी झाली व अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले; पण अद्याप जमिनीचा ताबा ग्रा़पं़ कडे देण्यात आला नाही़ यामुळे सेलूच्या तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर यांना निवेदन सादर करून जमिनीचा ताबा ग्रा़पं़ कडे सोपविण्याची मागणी करण्यात आली़बोंडसुला ग्रा़पं़ द्वारे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली़ यावरून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत शुल्क अदा करून रितसर मोजणी करण्यात आली़ यात मोहन गिरी यांच्या शेतामध्ये अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले़ भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणीमध्ये ०़४० हे़आऱ शासकीय जमिनीवर गिरी यांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले़ या जमिनीवर भूमिलेख कार्यालयाने आखणी करून देत त्याची ‘क’ प्रत ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आली़ यानंतरही सदर शेतकऱ्याने बोंडसुला ग्रा़पं़ ला जमिनीचा ताबा दिलेला नाही़ सदर इसमाचे राजकीय संबंध असल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार सदर व्यक्तीवर कारवाई करीत नसल्याचे ग्रा़पं़ ने नमूद केले आहे़ सरपंच व इतर सदस्यांना बोलवून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे़ शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात ग्रा़पं़ कार्यालयास कुठलीही मदत केली जात नसल्याने ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे़ गोसावी समाजाने दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावा म्हणून बोंडसुला ग्रा़पं़ कडे अर्ज केला आहे़ त्यानुसार ग्रामपंचायतने सदर प्रकरण ग्रामसभेत मांडले आणि सर्वानुमते ग्रामसभेतून गोसावी समाजाला पूर्व-पश्चिम रोडला लागून सर्व्हे क्ऱ २५७ या शेतातून एक एकर जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला़ हा ग्रामसभेचा ठराव तहसीलदार कार्यालयास सादर करण्यात आला; पण तहसीलदारांनी गोसावी समाजाला अद्यापही जागा दिलेली नाही़ हा ग्रामसभेचा अपमान असल्याचेही ग्रा़पं़ प्रशासनाने निवेदनात नमूद केले़ या प्रकारामुळे बोंडसुला येथील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ तहसील प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला सहकार्य केले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ तहसीलदार व वरिष्ठ अधिाकऱ्यांनी चौकशी करून अतिक्रमण काढावे व समस्या सोडवावी, अशी मागणी बोंडसुला ग्रा़ पं़ ने केली़(कार्यालय प्रतिनिधी)