शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कामे बंद करण्याचा निर्णय

By admin | Updated: December 18, 2014 23:00 IST

जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध लेखा शिर्षामध्ये रखडलेल्या देयकाकरिता वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार संघटनेद्वारे १५ डिसेंबर पासून बांधकाम

संताप : अधिकारी म्हणतात, देयके देण्यास असमर्थ वर्धा : जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध लेखा शिर्षामध्ये रखडलेल्या देयकाकरिता वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार संघटनेद्वारे १५ डिसेंबर पासून बांधकाम विभागासमोर साखळी उपोषण सुरू आहे. परंतु गुरुवारी १८ डिसेंबरपर्यंत विभागाकडून कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. त्यामुळे २० डिसेंबरपासून सर्व विकासकामे बंद व ताळेबंदीचा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर १६ डिसेंबर रोजी उपोषण मंडपाला अभियंता मंडळ, चंद्रपूरचे प्रभारी अधीक्षक प्रशांत जनबंधू आणि वर्धा जिल्हा सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता राजू गायकवाड यांनी संयुक्तपणे भेट दिली. प्रलंबित देयके शासनाकडूनच उपलब्ध झाली नसल्याने आपणास देयके देण्यास असमर्थ असल्याचे कारण त्यांनी पुढे केले. परंतु काढता पाय घेण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या कारणाने उपोषणकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.शासनाकडे निधी उपलब्ध नव्हता तर आमच्याकडून विकासात्मक कामे का करून घेण्यात आली असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून आपली वेळ मारून नेली. परंतु जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील व नियोजन अधिकारी यांच्या अखत्यारित असलेला निधी प्रामुख्याने ३४५१-२४५० खासदार फंड आणि ४२५० हे पूर हानी या लेखाशिर्षांतर्गत असलेली कामे ही तात्काळ शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यामार्फत वळती केली जाते. परंतु आलेला निधी अजूनपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा यांच्याकडे वळता न केल्याचे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग येथील कार्यकारी अभियंत्यांद्वारे सांगितले जात असल्याने कोण कोणाच्या आदेशाची वाट पाहता आहे हा संभ्रम निर्माण झाला आहे. १९ डिसेंबरपर्यंत विभागाकडून ठोस आश्वासन न मिळाल्यास शनिवार २० डिसेंबरपासून संघटनेतर्फे विकास कामे बंद व ताळेबंदीचा इशारा देण्यात आला आहे. १८ डिसेंबर हा उपोषणाचा चवथा दिवस असून त्यात रसीद शेख, अमर राठोड, गुड्डू चव्हाण, गोविंदा आस्कर हे उपोषणाला बसले आहे.(शहर प्रतिनिधी)