शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सबसिडीसाठी ग्राहकांच्या चकरा

By admin | Updated: April 4, 2017 01:21 IST

बँक खात्यांसोबत आधार कार्ड लिंक करीत शासनाने गॅस सिलिंडरचे अनुदान आॅनलाईन खात्यात जमा करण्याचे धोरण स्वीकारले आहे; ...

बँक, एजन्सीकडून टाळाटाळ : आधार लिंकिंगचा घोळ कायमचवर्धा : बँक खात्यांसोबत आधार कार्ड लिंक करीत शासनाने गॅस सिलिंडरचे अनुदान आॅनलाईन खात्यात जमा करण्याचे धोरण स्वीकारले आहे; पण यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लिंकिंगचा घोळ अजूनही संपला नसून ग्राहकांना सबसिडीसाठी चकरा माराव्या लागत आहे. बँक, एजेंसीधारक व पुरवठा विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. सिंदी (मेघे) येथील रमेश महादेव कैकाडी यांचे सिंडीकेट बँकेमध्ये खाते आहे. मागील कित्येक वर्षांपासून असलेले हे खाते यापूर्वीच आधार कार्डशी लिंक करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर यापूर्वी त्यांच्या खात्यात गॅस सिलिंडरची सबसिडीची रक्कम जमा झाली आहे. हे लिंकिंग कधी अ‍ॅक्टीव तर कधी अनॅक्टीव दाखवित असल्याने सदर ग्राहकांना अकारण त्रास सहन करावा लागत आहे. कैकाडी यांचे खाते २७ जून २०१६ पासून इनॅक्टीव्ह दाखवित आहे. परिणामी, नऊ महिन्यांचे सिलिंडरचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. यापूर्वीही त्यांना हा त्रास सहन करावा लागला. याबाबत रमेश कैकाडी यांनी अनेकदा सिंडीकेट बँकेत चकरा मारल्या. तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकांशीही चर्चा केली; पण काहीही उपयोग झाला नाही. बँकेतून त्यांना संबंधित गॅस वितरकाकडे पाठविले जात आहे. वितरकाकडे विचारणा केल्यास ही बाब बँकेच्या अधीन असून तेच मार्ग काढू शकतील, असे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे ग्राहकाचाच फुटबॉल होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पुरवठा विभागासह संबंधित बँक प्रशासन व वितरकाने याकडे लक्ष देत ग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)किमतीतही वाढीचे सातत्यसध्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सोमवारी तर अनुदानातील सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे लाभार्थी शासनाच्या सबसिडीचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा बाळगतात; पण लिंकिंगचा घोळ सुटता सुटत नसल्याने ग्राहकांनाच त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार एकाच ग्राहकाशी घडत नाही तर अनेक नागरिकांना आपल्याच हक्काच्या सबसिडीसाठी कधी बँक, कधी वितरक तर कधी पुरवठा विभागात चकरा माराव्या लागतात.