शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

९३,८१५ हेक्टरवर होणार पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.

ठळक मुद्देरबीच्या क्षेत्रात २७ हजार हेक्टरने वाढीची शक्यता : गत वर्षी होते एकूण ६६,८८९ हेक्टर पेरणीक्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसाचा चांगला फटकाच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला. असे असले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा कायम आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वच जलाशय फुल्ल झाले आहेत. त्यामुळे यंदा रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असून रबी हंगामात ९३ हजार ८१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. खरीपात झालेल्या नुकसानाची भरपाई काढण्यासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबी हंगामासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा रबीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी रबी हंगामात ६६ हजार ८८९ हेक्टरवर शेतकºयांनी गहू, चणा आदी पिकांची लागवड केली होती. तर यंदा जिल्ह्यात ९३ हजार ८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.४७,८६२ क्विंटल बियाणे लागणारयंदा ९३,८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होणार असल्याचा कयास कृषी विभागाचा असून त्याकरिता किती बियाणे लागेल याचा अंदाज काढण्यात आला आहे. रबी हंगामात एकूण ४७ हजार ८६२ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून आतापर्यंत अडीच हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात चणा बियाण्याचा समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत गव्हासह इतर विविध बियाणे प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.यंदा खतकोंडी होणार नाहीचसध्यास्थितीत जिल्ह्यात २५ हजार मेट्रीक टन खत आहे. शिवाय रबी हंगामासाठी वेळीच खताचा साठा जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे यंदा रबी हंगामात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात खतकोंडी होणार नसल्याचे कृषी बोलले जात आहे.रबी हंगामात लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण खत, बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच विशेष प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे सध्या मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत जिल्ह्यात आहे.- अभय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती