शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटप थांबले; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 20, 2014 00:00 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा

सुकळीच्या बँकेचा प्रताप : शाखा व्यवस्थापकाचे पद १५ दिवसांपासून रिक्तआकोली : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा निपटारा थांबला आहे़ शेतकरी दररोज आशाळभूत नजरेने बँकेने जातात; पण त्यांना कर्ज पुरवठा होत नाही़ बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़पावसाळा दारात आला आहे़ शेती मशागतीची कामे पूर्ण झलीत़ काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्यात़ सुकळी (बाई) शाखेचा नियमित कर्जदार शेतकरी पतपुरवठा थांबल्याने रडकुंडीस आला आहे. शाखेत आधीच कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांवर बँकेचा कारभार चालविला जात आहे. अशातच शाखा व्यवस्थापकाची १५ दिवसांपूर्वी बदली झाली. पीक कर्ज वाटपाचा हंगाम असल्याने बँक प्रशासनाने त्वरित दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ नवीन अधिकारीच येण्याची प्रतीक्षा न करता जुन्या अधिकाऱ्याने येथून काढता पाय घेतला व नवीन अधिकारीही आला नाही़ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे.गत १५ दिवसांपासून दररोज कृषी कर्जाची प्रकरणे बँकेत येत आहे; पण कर्ज मंजूर करायला अधिकारीच नाही़ बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत़ केवळ खात्यात जमा असलेली रक्कम अदा (पे-कॅश) करण्याचाच अधिकार त्यांना आहे. यामुळे सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे़ शेतकऱ्यांचा संताप टाळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्याचे दिसते़ शेतकरी दररोज बँकेत चकरा मारत आहे; पण उपयोग होत नाही़ कृषी सेवा केंद्रातून उधारीवर बियाणे मिळत नाही. खिशात पैसा नाही. बँकेवर भिस्त होती; पण पेरणीचा हंगाम सुरू होऊनही कर्ज न मिळाल्याने शेतकरी हताश झाला़ परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरण्या व बियाणे खरेदी यामुळे खोळंबल्याचे दिसते़ बियाणे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापक नेमावा किंवा कर्ज प्रकरणांसाठी तात्पुरता अधिकारी पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)