शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

By admin | Updated: June 19, 2014 00:11 IST

शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी

हवामानाचा आधार : बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी करावर्धा : शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक उल्हास नाडे आदी उपस्थित होते.सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी केल्यानंतरच सर्व विक्रेत्यांनी बियाण्यांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केले़ अतिवृष्टी व पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन बियाण्यांवर विपरित परिणाम झाला़ यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे व उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे़ बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदी करताना दुकानदारांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासली आहे वा नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करताना प्रत्येक लॉटमधील बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच विक्री करावी़ सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी कापसासह इतर पिकांनाही प्राधान्य द्यावे़ उगवण क्षमता असलेले बियाणे खरेदी करावी. असेही जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी यावेळी सांगितले.पीक विमा योजनेचा लाभ घ्यामहाराष्ट्र शासनाने हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे़ सोयाबीन व कापूस पिकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ३० जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले़ कापूस व सोयाबीन पिकाकरिता वर्धा जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ यात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस यापासून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना वर्धा जिल्ह्यातील सर्व गावांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची राहणार आहे़ पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी १ हजार २४५ रुपये तर सोयाबीन पिकासाठी ७१४.४० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे़ तेवढीच रक्कम शासन अदा करणार आहे़ पीक विम्याच्या संरक्षणात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस झाल्यास नुकसानीबाबत पिकांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)