शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागावर काळोखाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 05:00 IST

पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. पथदिव्यांच्या थकीत विद्युत देयकाची रक्कम मोठी असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांना महावितरणकडून विद्युत जोडणी देण्यात आली आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती, नगरपंचायती तसेच नगरपालिकांकडून सध्या पथदिव्यांचे विद्युत देयक वेळीच अदा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे. पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. पथदिव्यांच्या थकीत विद्युत देयकाची रक्कम मोठी असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या     अडचणीत भर पडली आहे. थकबाकी वसुलीसाठी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहारही सूरू आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकेने वेळीच पथदिव्यांचे थकीत देयक अदा करावे, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

वारंवार केला जातोय पत्रव्यवहार-    जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती, सेलू, समुद्रपूर, कारंजा (घा.) व आष्टी या चार नगरपंचायती तसेच वर्धा, सिंदी (रेल्वे, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी या सहा नगरपरिषद आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांचे थकीत विद्युत देयक वेळीच अदा करावे यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था थकीत देयक अदा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले.

महावितरण राबविणार विशेष मोहीम-    पथदिव्यांच्या विद्युत देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहीम दरम्यान थकबाकी न भरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पथदिव्यांची विद्युत जोडणी कापली जाणार आहे. त्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी तयार केला असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :electricityवीज