शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जनसमस्यांसाठी माकपचा मोर्चा

By admin | Updated: March 2, 2015 00:17 IST

राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व म़रा़ शेतमजूर युनियन (लालबावटा) ...

वर्धा : राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व म़रा़ शेतमजूर युनियन (लालबावटा) तालुका कमिटीद्वारे तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़सामान्य नागरिकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे. शिधापत्रिकेवर महिन्याकाठी ५ लिटर रॉकेल देण्यात यावे़ गॅस सिलिंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न करता पूर्ववत स्वस्त भावात गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, आवश्यक बेघर नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तालुक्यात मनरेगाद्वारे मागेल तेव्हा कामे देण्यात यावी अन्यथा बेरोजगार भत्ता द्यावा, मजुरांना थकित वेतन देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी व तहसीलदार आष्टी यांना देण्यात आले.बाजार चौकातून निघालेला मोर्चाने प्रारंभी पंचायत समितीवर धडक दिली़ यावेळी गटविकास अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले़ सदर समस्या त्वरित निकाली काढाव्यात, अशी मागणीही करण्यात आली़ या समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला़ यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला़ यावेळी निदर्शने करण्यात आली. राशन, रोजगार, रॉकेल, घरकूल, गॅस सिलिंडर आदी मागण्यांबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ सदर मागण्यांबाबत शासनाकडे विनाविलंब पाठपुरावा करावा, अशी मागणीही माकपने केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली़यावेळी झालेल्या सभेला यशवंत झाडे, महेश दुबे, दिलीप शापा मोहन व संजय भगत यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी मोदी सरकारच्या अच्छे दिन कल्पनेवर ताशेरे ओढले़ हे सरकार अदानी, अंबानीसाठी अच्छे दिन आणत असून महागाई, राशन आदी गंभीर समस्यांच्या माध्यमातून जनतेसाठी बुरे दिन घेऊन येत आहे़ यामुळे या जनताविरोधी धोरणाचा कष्टकरी वर्गाने एकत्र येऊन विरोध करणे गरजेचे झाले आहे, असे मत मान्यवरांनी सभेत व्यक्त केले़मोर्चामध्ये माकप तालुका सचिव संध्या संभे, अशोक कोहळे, राजकुमार राऊत, हरीष बागडे, राजेश चौधरी, रेखा ढबाले, मुकूंद कुरवाडे, रेखा धारस्कर, ज्योती गाडगे, शीला चौधरी, महेश शेंदरे, शंकर मानमोडे, राजू देशमुख, राजू चोपडे, निर्मला राऊत, बाळू नेहारे, सुधाकर बोरवारे, आशा गवळी, किसन सनेसर, सुरेश लांडगे आदी माकपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व एक हजारहून अधिक शेतमजूर, महिला-पुरूषांचा समावेश होता़(स्थानिक प्रतिनिधी)