शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या कोविड योद्धा महिलांचा गृहअलगीकरणातील ‘ॲक्टिव्ह’ कोरोना बाधितांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 22:37 IST

जिल्ह्यात सध्या १ हजार ६०० हून अधिक ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी लक्षणविरहित तसेच कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने गृहअलगीकरणात ठेवले आहे, तर गंभीर रुग्ण सध्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात असलेल्या काही कोरोनाग्रस्तांकडून गृहअलगीकरणाच्या नियमांना बगल दिली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने या व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याच्या सूचना वर्धा नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या.

ठळक मुद्देअल्पावधीतच वर्धा शहर पिंजून १ हजार २० गृहभेटी : वर्धा नगरपालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या दिशेने पडताहेत पाऊल

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गृहअलगीकरणात असलेल्या कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी वर्धा नगरपालिका प्रशासन बचत गटाच्या महिलांचे सहकार्य घेत आहे. या महिलांनी पहिल्या फळीतील कोविडयोद्धांची भूमिका निभवित अल्पावधीतच तब्बल १ हजार २० ॲक्टिव्ह संक्रमितांच्या घरी भेट देऊन त्यांना गृहअलगीकरणाच्या नियमांचे पालन स्वत:सह समाजातील इतर नागरिकांसाठी कसे उपयुक्त आहे, हे पटवून दिले आहे.जिल्ह्यात सध्या १ हजार ६०० हून अधिक ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी लक्षणविरहित तसेच कोविडचे सौम्य लक्षणे असलेल्यांना आरोग्य विभागाने गृहअलगीकरणात ठेवले आहे, तर गंभीर रुग्ण सध्या कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. गृहअलगीकरणात असलेल्या काही कोरोनाग्रस्तांकडून गृहअलगीकरणाच्या नियमांना बगल दिली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने या व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याच्या सूचना वर्धा नगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गृहअलगीकरणात असलेल्या वर्धा शहरातील ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी महिला बचत गटाच्या सदस्यांचे सहकार्य सध्या वर्धा नगरपालिका घेत आहे. आरोग्य विभागाकडून गृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांची यादी येताच पहिल्या फळीतील कोविडयोद्धांप्रमाणे या महिला ‘ॲक्टिव्ह मोड’वर येत गृहभेटी देत असल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांच्या तीन चमूगृहअलगीकरणाचा नियम मोडून घराबाहेर फिरणाऱ्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर दंडात्मकसह फौजदारी कारवाई करण्यासाठी वर्धा नगरपालिका प्रशासनाने शिक्षकांच्या तीन चमू तयार केल्या आहेत. गृहअलगीकरणाचा नियम मोडणाऱ्या एकाही व्यक्तीवर या चमूने कारवाई केली नसली तरी माहिती मिळताच या विशेष चमू ‘ॲक्टिव्ह मोड’वर येत असल्याचे सांगण्यात आले.

एका दिवशी किमान ५० गृहभेटीगृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सध्या महिला बचत गटाच्या दहा महिलांची निवड वर्धा नगरपालिका प्रशासनाने केली आहे. प्रत्येक महिला दरदिवशी गृहअलगीकरणातील किमान ५० ॲक्टिव्ह कोरोनाबाधितांच्या घरी भेट देतात.

प्रत्येक दिवशी दिली जातेय भेट

गृहअलगीकरणात असलेल्या व्यक्तींच्या घरी या महिला दररोज भेट देऊन गृहअलगीकरणात असलेला व्यक्ती घरीच थांबत आहे की घराबाहेर पडतो, याबाबतची माहिती घेतात. सध्या दहा महिलांचे सहकार्य वर्धा नगरपालिका घेत आहे.केवळ ३०० रुपये मानधनगृहअलगीकरणात असलेल्या ॲक्टिव्ह कोरोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी निवड करण्यात आलेल्या महिलांना ३०० रुपये इतके नाममात्र मानधन दिले जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या