शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनाच्या घटीमुळे कापूस दरवाढीचे संकेत

By admin | Updated: December 9, 2015 02:24 IST

कापसाचे नेहमी होत असलेले उत्तम पीक, गत वर्षीच्या शिल्लक गाठी, परदेशातील घटत्या मागणीमुळे निर्यातीतील घट...

तज्ज्ञांचा अंदाज खुजा : सूत गिरणीची मागणी अधिकफनिंद्र रघाटाटे रोहणाकापसाचे नेहमी होत असलेले उत्तम पीक, गत वर्षीच्या शिल्लक गाठी, परदेशातील घटत्या मागणीमुळे निर्यातीतील घट व आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी यामुळे कापसाच्या किमतीत सन १५-१६ च्या हंगामातही मंदी राहील, असा या कृषी क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या खरीपात पडलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात घट वर्तविली जात आहे. होणाऱ्या उत्पादनातून देशातील सूतगिरण्यांची मागणीच पूर्ण होवू शकणार नसून कापसाच्या भावात तेजी येणे क्रमप्राप्त आहे, असे चित्र प्रत्यक्ष उत्पादनावरून दिसत आहे. यावर्षी सोयाबीनच्या तुलनेत कापसाचा पेरा अधिक झाला. पेरण्या साधल्या, पाऊस कमी असूनही पऱ्हाटीच्या झाडांची वाढ पर्याप्त प्रमाणात झाली आहे. हे सर्व पाहून सप्टेंबर २०१५ मध्ये कृषी तज्ज्ञांनी संपूर्ण देशात ६२९ लक्ष क्विंटल उत्पादनातून देशात ३७० लक्ष गाठी तयार होतील. गत वर्षीच्या ३५ लाख गाठी शिल्लक आहेत. विक्रीसाठी ४०५ लक्ष कापूस गाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. देशातील एकूण सर्व सूतगिरण्यांना वर्षाकाठी ३२० ते ३२५ लक्ष गाठी लागतात. सदर मागणीचा विचार करता उत्पादन अधिक व मागणी कमी, असे चित्र अपेक्षित केले. इतर भागात मागणी कमी असल्याने निर्यातीला देखील वाव नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने आपला कापूस विकून मोकळे होण्याचा सल्ला तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला होता.प्रत्यक्ष उत्पादनानुसार तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरण्याची शक्यता आहे. अनेक कापूस उत्पादक भागात परतीचा व अवकाळी पाऊस न आल्याने ‘फरदड’ कापूस निघण्याची शक्यता मावळली आहे. कोरडवाहू जमिनीतील कापसाची डिसेंबर अखेर उलंगवाडी होणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे संकेत दिसत आहे. गत वर्षीच्या ३५ लक्ष शिल्लक गाठी विचारात घेता यावर्षी विक्रीसाठी ३०० लक्ष गाठी उपलब्ध होतील. त्यापेक्षा देशातील सूतगिरण्यांची मागणी जास्त आहे. प्रत्यक्ष उत्पादनानंतरची स्थिती लक्षात घेता यावर्षी भविष्यात कापसाच्या भावात तेजी येण्याचा संकेत मिळत आहे.