शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्यात योगदान; सैनिकांना मान- सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 05:00 IST

सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत आहे. हा दिवस भारतीयांना अनुभवता यावा याकरिता अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्यांची पहाट आपल्या नशिबी आली. या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नी यांना आजही शासन प्रशासनाकडून मान-सन्मान दिला जातो. तो पुढेही कायम राहावा, याकरिता सर्वांनी प्रयत्नशील असण्याची गरज आहे.सेवाग्राम हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वर्धा आणि सेवाग्राममध्ये बराच काळा वास्तव्य राहिल्याने जिल्ह्याचे स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान राहिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ चा नारा दिल्यानंतर देशभरात स्वातंत्र्यलढ्याची क्रांतिकारक वाटचाल सुरू झाली. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली. स्वातंत्र्यानंतर या सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची शासनाने दखल घेऊन त्यांना भारतीय स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ सन्मानपत्र देण्यात आले. यासोबतच त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांनी दिलेल्या लढ्यानुसार राज्य शासनाकडून दरमहा १० हजार रुपये पेन्शन तर केंद्र शासनाकडून दरमहा ३१ हजार १०० रुपये पेन्शन दिली जाते. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तर ३६ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या विधवा पत्नी हयात आहेत. या सर्वांना शासनाच्या पेन्शन योजनेसह स्वातंत्र्यदिन आणि गणराज्यदिनी प्रशासनाकडून मान, सन्मानही दिला जातो. आज स्वातंत्र्यदिनी या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची आठवण होते क्रमप्राप्त आहे. 

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन