शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांमुळे ग्राहक त्रस्त

By admin | Updated: August 26, 2016 02:08 IST

स्थानिक बँक आॅफ इंडियाची शाखा अत्यल्प जागेत कार्यरत आहे. बँकेतील असुविधांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत

बँकेतील प्रकार : शेतकऱ्यांची लूट, पीक कर्जाची १९० प्रकरणे मंजूरेकारंजा (घा.) : स्थानिक बँक आॅफ इंडियाची शाखा अत्यल्प जागेत कार्यरत आहे. बँकेतील असुविधांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बँकेतून पीक कर्जाची आतापर्यंत १९० नवीन प्रकरणे मंजूर झाली असून या कर्जाकरिता सर्च रिपोर्टच्या नावावर मनमानी शुल्क आकारले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. शहरात चार वर्षांपूर्वी बँक सुरू करण्यात आली होती. ती एका छोट्या खोलीत आहे. आता लोकसंख्या व ग्राहकांची संख्या वाढत असून ही जागा अपूरी पडत आहे. यामुळे ग्राहकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. अनेक असुविधा असलेली ही इमारत २० वर्षांच्या करारपट्टीवर भाड्याने घेताना बँक व्यवस्थापनाने भविष्यात होणाऱ्या विस्ताराचा कुठलाही विचार केलेला नसल्याचेच यातून दिसून येत आहे. या बँकेत ग्राहकांना पैसे काढणे वा टाकण्यासाठी रांग लावण्यास जागा नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसायला जागा नाही. बाजारातील गर्दीप्रमाणे महिला-पुरूषांना एकमेकाला चिकटून उभे राहावे लागते. पैसे काढण्याची स्लीप भरायला टेबल नाही. पासबुक प्रिंट करणारी मशीन बंद असते. बँकेत ग्राहकांना उभे राहण्यासाठी वा बसण्यासाठी जागा नसल्याने आर्थिक व्यवहार करणे धोकादायक झाले आहे. पिण्याच्या पाण्याची व ग्राहकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. बँकेचे एटीएम मशीन नेहमीच बंद असते. झालेले आर्थिक व्यवहार एसएमएस करून ग्राहकांना कळविण्याची तसदी घेतली जात नाही. अशा अनेक मुलभूत सुविधा नसलेल्या या बँक इमारतीचा भाड्याचा २० वर्र्षांचा करार रद्द करून बँकेसाठी नवीन पुरेशी जागा असलेली इमारत भाड्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे. जेवणाच्या सुटीत बँकेचे दार बंद करण्यात येते. यामुळे ग्राहकांना पायऱ्यांवर बसावे लागते.पीक कर्जाची नवीन १९० तर नूतनीकरणाची ८० प्रकरणे मंजूर केली. एक लाखापेक्षा अधिक कर्जासाठी सर्च रिपोर्ट सादर करावा लागतो. यात मनमानी शुल्क आकारले जाते. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)