शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला

By admin | Updated: September 15, 2016 01:05 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती.

प्रकाश कांबळे : संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रावर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती. आपले विचार मांडता येत नव्हते. जाती व्यवस्थेमुळे काही घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्कही नाकारला होता. पण १९५० पासून भारतीय संविधानाने देशातील अस्पृश्यता, वेठबिगारी दूर करून प्रत्यकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा उमरी या गावापासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्र्यंत २१ कार्यक्रम पार पडले आहेत. सेवाग्राम येथून यात्रेचा चौथा टप्पा सुरू करून खरांगणा गोडे, वाघोली, मदनी, करंजी काजी, करंजी भोगे अशी प्रबोधन यात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे बोलत होते. महाराष्ट्र अंनिसच्या आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीच्या सहकार्याने प्रा. नूतन माळवी व गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानाची मुल्ये, अधिकार, कर्तव्ये नागरिकांना कळावी, यासाठी संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा वर्धा जिल्ह्यात काढण्यात आली आहे. याप्रसंगी सुनील सावध, सुरेश बोरकर, पंकज सत्यकार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, वाटचाल व मिळालेले अधिकार याबाबत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी संविधानातील पर्यावरणीय घटकांचे सरंक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. संचालन सुनील ढाले, तर आभार भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. कपिल गोडघाटे, अशोक वेले, अविनाश काकडे, विजय आगलावे आदींनी सहकार्य केले. संजय भगत यांनी प्रबोधन गीत सादर केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)