शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींसाठी काँग्रेसकडून ‘श्रेय’वाद

By admin | Updated: January 15, 2017 00:42 IST

स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीदभूमी आष्टीच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री

भाजप नगरसेवकांकडून निषेध : निविदा प्रक्रिया करण्यास टाळाटाळ अमोल सोटे  आष्टी (श.) स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीदभूमी आष्टीच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटींचा निधी दिला. यातून ३ कोटी गावातील विकास कामे तर २ कोटी स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळावर खर्च होणार ओह. यातील ३ कोटींच्या कामाची ई-निविदा होऊन भूमिपूजन सत्ताधारी काँग्रेसच्या आमदार व नगराध्यक्षांनी केल्याने श्रेयवादाला तोंड फुटले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ९ कामांना कार्यारंभ मिळाला. भूमिपूजनानंतर तब्बल तीन महिने कामे ठप्प पडली आहे. पालकमंत्री येण्यापूर्वीच नगरपंचायतने भूमिपूजन केले. यावर भाजपाचे नेते दादाराव केचे व नगरसेवक काहीच बोलले नाही. केचे यांच्या प्रयत्नांमुळे पालकमंत्र्यांनी निधी दिला, हे वास्तव तालुक्याला माहिती आहे. कालपर्यंत सर्व ‘आॅल वेल’ होते; पण १५ दिवसांपासून काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जाहीर पोस्टरबाजी सुरू केली. यात निधी आणून कामे केल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यांची गंभीर दखल भाजप नगरसेवकांनी घेतली. त्यांनी नगर पंचायत सभेत आवाज उठविला. तीन कोटींचे भूमिपूजन तुम्ही केले; पण निधी पालकमंत्र्यांनी दिला. याचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे भाजप गटनेते अशोक विजयकर यांनी काँग्रेस नगरसेवकांना सुनावले. सोबतच नगर पंचायतच्या बोगस तथा जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवणाऱ्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली. यात न.पं. च्या हक्काचा १४ व्या वित्त आयोगाचा १ कोटी ८८ लाख रुपये निधी एक वर्षापासून तसाच पडून का आहे, वर्षभरात एखादा रपटा वा नाली केली काय, रस्ता अनुदानाचे २० लाख रुपये येऊन ६ महिने झाले. यातून रस्ता कामे का केली नाही. नागरी दलित वस्तीच्या विकासाकरिता एक वर्षापासून आलेल्या २१ लाख रुपये निधीची कामे सुरू करण्यास काँग्रेस नगरसेवकांचा अट्टहास आहे. क वर्ग यात्रा स्थळातील कपिलेश्वर देवस्थान टिपरीवाले बाबा देवस्थान, पीरबाबा टेकडी देवस्थानची बंद पडलेली कामे सुरू करण्यासाठी कुठलाही पाठपुरावा केला नाही. नगरपंचायतला जोडलेल्या मौजातील बंद पडलेल्या पांदण दुरूस्तीच्या कामासाठी सत्तारूढ काँग्रेसने काय पाठपुरावा केला. गरीबांच्या निवाऱ्यासाठी असलेल्या घरकूल योजनेची सुरूवात केली नाही. शेतकरी, महिला, अपंग, दलित, आदिवासी व मुस्लीम अल्पसंख्याकांकरिता असलेल्या शासकीय योजनांसाठी वर्षभरात काहीही प्रयत्न केले नाही. काँग्रेसच्या स्वनाम-धन्य नेत्यांनी आधी जनतेला उत्तरे द्यावी, असे आव्हान भाजप नगरसेवकांनी केले आहे.