शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकांनी अपहरण केल्याची तक्रार

By admin | Updated: July 15, 2015 02:35 IST

दोन ट्रक चालकांनी एका अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी पुलगाव येथे उघड झाला.

पुलगाव ठाण्यात गुन्हा दाखल : तीन दिवसांपासून अल्पवयीन युवती बेपत्तावर्धा : दोन ट्रक चालकांनी एका अल्पवयीन युवतीचे अपहरण केल्याचा प्रकार मंगळवारी पुलगाव येथे उघड झाला. या प्रकरणी युवतीच्या आजीने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूद्ध अपहारणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह दोघेही रा. नेवरी, जि. आग्रा, उत्तरप्रदेश अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आजच तक्रार झाल्याने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. यात एक चमू तयार करून तक्रारीतील या दोन्ही ट्रक चालकांच्या गावी पाठविण्यात येणार असल्याचे ठाणेदार शिरतोडे यांनी सांगितले.पोलीस सूत्रानुसार, पुलगाव ठाण्याच्या हद्दीतील नाचणगाव मार्गावरील खडकपूरा येथे १५ वर्षीय युवती तिच्या आजी सोबत राहत होती. हा मार्ग भोपाळकडे जात असल्याने या मार्गावरील ट्रक या परिसरातील चौकात थांबतात. यामुळे स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह दोघेही या परिसरात काही दिवसांपूर्वी थांबले होते. सदर युवतीचे घर याच परिसरात असल्याने तिची या दोघांशी ओळख झाली. यानंतर या मार्गाने जाताना हे दोन्ही ट्रक चालक नेहमी थांबत होते. ते एक दोन तास नाही तर येथे तीन-चार दिवस थांबत असल्याची माहिती आहे. अशातच शनिवारी (दि.११) स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह हे दोघे तिथे मुक्कामाकरिता आले, त्याच दिवसापासून सदर युवती बेपत्ता असल्याचे तिच्या आजीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या दोघांनी तिचे अपहरण केले असल्याचा आरोप पोलिसात करण्यात आलेल्या तक्रारीत आहे. या तक्रारीवरून पुलगाव पोलिसात या स्वराजसिंह कुशवाह व सत्यप्रकाश कुशवाह भादंविच्या कलम ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.(प्रतिनिधी) पवनार येथे विवाहितेचा विनयभंगसदर युवती ही तिच्या आजीसोबत येथे वास्तव्यास होती. तिचे आई - वडील दुसऱ्या गावात राहतात. ती येथे राहत असतानाच तिची या दोन्ही ट्रक चालकांशी ओळख झाली. यातून तिचे अपहरण झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस करीत असून काय सत्य बाहेर येते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.वर्धा- किराणा साहित्य आणण्यासाठी जात असलेल्या एका विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना पवनार येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सतीश लाखे असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला ही किराणा साहित्य आणण्यासाठी दुकानात चालली होती. दरम्यान, सतीश लाखे याने तिचा हात पकडून विनयभंग केला तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.