शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोराची बिनधास्त तक्रार करा, तो जेरबंद होईल अन् कामही होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये असल्यामुळे या ठिकाणी लाचखोरांवर कारवाईही जोरात सुरू असते. एसबीच्या अंतर्गत तीन वर्षांत तब्बल २० लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून यावर्षी मात्र, केवळ दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. कामासाठी लाच देणारी व्यक्ती काही तरी बेकायदा काम घेऊन आलेली असते. असे काम केल्यास सरकारी अधिकाऱ्याची नोकरी धोक्यात येऊ शकते.  हे लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी अशी बेकायदा कामे घेऊन येणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी कराव्यात तसेच एखादा अधिकारीच जर लाचेची मागणी करीत असेल तरी देखील नागरिकांनी बिनधास्तपणे आपली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, तुमचे कामही होईल आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाईदेखील होईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. लाच घेणाऱ्यांमध्ये गृहविभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, कामगार विभाग आदी विभागातील सराकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

अडलेले काम पूर्ण होणारच-जे काम पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकारी लाच मागेल, ते काम लाच न देताही पूर्ण होईलच. त्यामुळे लवकर काम करण्यासाठी लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. जर सरकारी अधिकारी किंवा बाबू किंवा इतर कुणीही लाचेची मागणी करीत असेल तर थेट एसबीला कळवावे, तुमचे कामही होईल आणि लाचखोरावर कारवाईदेखील होईल.

या क्रमांकावर बिनधास्त करा तक्रार -सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यात एसीबीने सुरु केली हेल्पलाईनnलाचखोरांना पकडण्यासाी मोठ्या प्रमाणात तक्रारदार पुढे यावेत, या हेतूने एसीबीने १०६४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. राज्यभरात कुणीही २४ तास केव्हाही फोनवर तक्रार नोंदवू शकता.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण