शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

समिती गठित; पण चौकशीला विलंब

By admin | Updated: June 4, 2017 01:01 IST

गावातील तब्बल २०० लाभार्थ्यांना शौचालय अनुदान रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती.

‘लोकमत’ वृत्ताची दखल : अधिकारी गावात फिरकलेच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : गावातील तब्बल २०० लाभार्थ्यांना शौचालय अनुदान रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती. यावरून चौकशीसाठी अधिकारी आले असता ग्रामविकास अधिकारी गैरहजर होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच चार सदस्यी चौकशी समिती गठित करण्यात आली; पण ते अधिकारीही अद्याप गावात फिरकले नाही. यामुळे चौकशीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात ९४८ लाभार्थ्यांना शौचालय मंजूर करण्यात आले. पैकी ७४४ लाभार्थ्यांचे मंजूर अनुदान ग्रा.पं. कार्यालयात पोहोचले; पण २०० लाभार्थ्यांना रक्कम मिळाली नाही, अशी तक्रार ग्रा.पं. सदस्य सुनील मोहेकर यांनी जि.प. सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेण्यासाठी ग्रा.पं. कार्यालयास भेट दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.एस. रेवस्कर हे गैरहजर होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जि.प. वर्धा यांनी स्वच्छ भारत (ग्रा.) अंतर्गत शौचालय अनुदानाची चौकशी करून मौक्का तपासणी करण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तत्सम पत्रही संबंधित अधिकाऱ्यांना दिले; पण अधिकारी गावात आलेच नसल्याची माहिती जि.प. सदस्य अंकिता होले यांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही चौकशी होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. जि.प. सीईओंनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी जि.प. सदस्य अंकिता होले यांनी केली आहे.तळेगाव येथील शौचालयांचे अनुदान आले; पण ते २०० वर लाभार्थ्यांना प्रदानच करण्यात आले नाही. याबाबतच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामविकास अधिकारीच गैरहजर होते. यामुळे चौकशी समिती गठित करण्यात आली; पण चौकशी अधिकारीही अद्याप गावात पोहोचले नाही. यामुळे गैरप्रकाराची चौकशी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.