शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाची वन्यप्राणी संरक्षणार्थ रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:21 IST

स्थानिक जामठा शिवारातील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८७ ला लागून असलेल्या एका शेतात जिवंत विद्युत वाहिणीचा धक्का लागून

ठळक मुद्देपोलिसांचाही सहभाग : शेतकºयांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक जामठा शिवारातील झुडपी जंगल सर्व्हे क्र. ८७ ला लागून असलेल्या एका शेतात जिवंत विद्युत वाहिणीचा धक्का लागून एक अस्वल मृतावस्तेत पडल्याचे भासऊन वनविभाग व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाहिची रंगीत तालीम केली. सदर मॉक ड्रिल मध्ये वनविभाग, पोलीस प्रशासन, महावितरण व पशुवैद्यकीय विभागाने तत्परता दाखवत कार्यवाही पूर्ण केली व प्रशासनाच्या विविध विभागामध्ये योग्य समन्वय असल्याचा अनुभव ग्रामस्थांना आला. यावेळी शेतकºयांना मार्गदर्शनही करण्यात आले.शेतकरी पीक संरक्षणार्थ विद्युत प्रवाह त्यांच्या शेताच्या सभोवताल लावतात. मात्र सदर जिवंत विद्युत प्रवाहामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, असा संदेश सदर प्रत्यक्षिकामार्फत देण्यात आला. वन्यप्राणी संरक्षणार्थ निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ इतर शासकीय विभागांशी समन्वय साधणे व परिस्थितीवर सकारात्मक नियंत्रण मिळविणे तसेच कार्यवाहित एकसुत्रता आणण्यासाठी रंगीत तालीमचे आयोजन करण्यात येत असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोटे यांनी नोंदविले.सदर रंगीत तालीम पोलीस अधीक्षक निर्मलादेवी व उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक वनसंरक्षक सुहास बढेकर यांच्या हजेरीत पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, शहर ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत मदने, सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या चमूसह मॉक ड्रिलमध्ये सहभाग नोंदविला. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिवाळे व महावितरणाचे अधिकारी संदीप लोहे आणि वनविभागाचे सागर बनसोड, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या सह सर्व कोटेवार, इंगळे, शेख, विजय कांबळे, पोहकर, जाधव, सिरसाट, अभिषेक मुके, पंकज भाखरे यांनी सहभाग नोंदविला.