वर्धा : जिल्ह्यातील १४ ग्रा़पं़ च्या ११८ जागांसाठी सार्वत्रिक तर १४ ग्रा़पं़ च्या १७ जागांसाठी बुधवारी पोटनिवडणूक घेण्यात आली़ गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणी सुरू झाली़ यात मतदारांनी काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप व शिवसेनेला संमिश्र कौल दिल्याचे स्पष्ट झाले़ समुद्रपूर तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रस, हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रवादी, आष्टीत काँगे्रस व भाजप तर कारंजातही संमिश्र कौल मिळाला़ देवळी तालुक्यात सहा सदस्य अविरोध निवडून आले तर सहा ग्रा़पं़ ची पोटनिवडणूक अर्ज न आल्याने रद्द करण्यात आली़गुरूवारी मतमोजणीनंतर मतदारांचा कौल स्पष्ट झाला़ वर्धा तालुक्यात चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका घेण्यात आल्या़ यात सेलसुरा ग्रा़पं़ मध्ये रिक्त पदावर विमल लक्ष्मण कांबळे यांनी १९२ मते घेत संगीता सुनील कांबळे (४२) यांना पराभूत केले़ सालोड (हिरापूर) येथे नजमा इब्राहिम पठाण यांनी ३२३ मते घेत वृंदा प्रवीण पुसदेकर (२५२) यांचा पराभव केला़ चितोडा येथे कविता श्यामराव लांडगे यांनी १०१ मते घेत वृशाली विक्रांत थुटे (८६) यांचा पराभव केला तर सावंगी (मेघे) ग्रा़पं़ मध्ये सुरेखा कैलास चौधरी यांनी २९६ मते घेत दुर्गा विनोद साटोणे (१३) यांचा पराभव केला़ नामांकन अर्जच दाखल न झाल्याने काही निवडणुका रद्द झाल्या तर अनेक ठिकाणी अविरोध निवडणूक पार पडली़(लोकमत न्यूज नेटवर्क)कारंजा तालुक्यात १०४ मतदारांद्वारे नोटाचा वापरतालुक्यात दोन ग्रा़पं़ च्या सार्वत्रिक तर चार पोटनिवडणुका पार पडल्या़ यात १०४ मतदारांनी ‘नोटाचा’ वापर केला़ धानोली येथे युवा कार्यकर्ते बुद्धेश्वर पाटील यांचा गट विजयी झाला़ मेटहिरजी येथे सुनंदा भलावी दोन वॉर्डातून निवडून आल्या़ मेटहिरजीच्या ९८ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला तर सेलगाव आणि सिंदीविहिरी येथील प्रत्येकी १० मतदारांनी ‘नोटा’चा आधार घेतला.मेटहिरजी - येथील विजयी उमेदवारांत भाऊराव टेकाम (१०९), राधेश्याम अवथळे (१४७), सुनंदा भलावी (९८), विमल भोस्कर (१२८), हरिदास भलावी (८८), सुनंदा भलावी (५८) यांचा समावेश आहे़धानोली - येथील बुद्धेश्वर पाटील (१३०), अरुण कुंभरे (१६८), दीपाली किनकर (१५६), कांता काळबांडे (१२३), अजय चोपडे (११५), रेखा गोंडगे, ज्योती किनकर हे विजयी झाले़पोटनिवडणुकीत खैरवाडा येथे सुनंदा फलके (१६२), देवानंद इंगळे (२१०), वनीता साठे (१७२), सिंदीविहिरीमध्ये नामदेव वरखडे (१३८), काशीबाई धुर्वे (१५८), सेलगाव (उमाठे) येथे ज्ञानेश्वर घंगाळ (१४७) तर तरोडा येथे सुनीता ढोणे (१२१) हे उमेदवार विजयी झाले़समुद्रपूर तालुक्यात सेना-रॉकाचे वर्चस्वसमुद्रपूर तालुक्यातील ५ ग्रा़पं़ च्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज तहसील कार्यालयात पार पडली़ यात सेना-राकाँचे वर्चस्व दिसून आले. दोन ग्रा़पं़ राष्ट्रवादीकडे, दोन शिवसेनेकडे तर एक ग्रा़पं़ मध्ये संमिश्र कौल दिला. यात प्रस्थापितांना हादरे बसले़मतमोजनीचे काम तहसीलदार पुष्पलता कुमरे, नायब तहसीलदार गौतम शंभरकर, बी.एन. तिनघसे, मंडळ अधिकारी के.डी. किरसान, आर.व्ही. चौधरी, जी.यु. म्हसाळे, एम.एस. भलावी यांनी पाहिले़ ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी चोख बंदोबस्त ठेवला़गिरड - प्रतिष्ठेच्या ग्रा़पं़ मध्ये १५ जागांकरिता ७१ उमेदवार रिंगणात होते. सर्व पक्षांनी उमेदवार उभे करून वरिष्ठांनीही हजेरी लावली़ आमदार समीर कुणावार व खासदार रामदास तडस यांनी येथे घरोघरी प्रचार केला; पण तो प्रभावी ठरला नाही़ येथे शिवसेनेला ५, भाजपला ३, काँग्रेसला २ तर मनसेला २ जागा राखता आल्या़ तीन जागांवर अपक्षांनी विजय मिळविला़विजयी उमेदवारांत पुरूषोत्तम पिजंरकर (२३६), चंदा कांबळे (३२२), शुभांगी काटेखाये (२९९), हमीद शेख (४२०), अश्विनी दोडके (२४७), अश्विनी ढोमणे (३१८), कवडू श्रीरामे (२१३), विजय तडस (२९२), शालू किचक (२३५), रामकृष्ण पोहनकर (२४४), गजानन कुंभारे (२१६), शालू अंबाडरे (२८७), दिलीप खाटीक (१८०), शारदा बोदे (२६९), सुनीता बावणे (२३९) यांचा समावेश आहे़
जिल्ह्यात राजकीय पक्षांना संमिश्र यश
By admin | Updated: April 24, 2015 01:55 IST