शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २५० औषधी दुकाने बंद

By admin | Updated: May 31, 2017 00:46 IST

विविध मागण्या शासनदरबारी रेटण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्टस्

बंदला संमिश्र प्रतिसाद : जिल्हा प्रशासनाला सादर केले मागण्यांचे निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : विविध मागण्या शासनदरबारी रेटण्यासाठी आॅल इंडिया आॅर्गनायजेशन आॅफ केमिस्टस् अ‍ॅन्ड ड्रगिस्टस् व महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे एक दिवसीय देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. संघटनेच्या आवाहनाला जिल्ह्यातील औषधी विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मंगळवारी दिवसभर व्यावसायीक प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. जिल्ह्यातील जवळपास २५० औषधी विकेत्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेऊन या आंदोलनाला समर्थन दर्शविले. आॅनलाईन फार्मसी, केंद्रीय ई-पोर्टलचा विचार केमिस्ट दुकानदारांना मान्य नाही. ई-पोर्टल नितीमुळे भारतातील औषधी विक्रेत्यांवर विपरीत परिणाम होणार असून औषधी मुल्य नियंत्रणामुळे औषधी विक्रेत्यांचे शोषण होणार असल्याचा आरोप करीत औषधी विकेत्यांच्याहिताचे निर्णय सरकारने घ्यावे आदी मागण्यांसाठी एक दिवसीय बंदचे आवाहन केले होते. जिल्ह्यातील जवळपास २५० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सदर आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन औषधी विकेत्यांच्या संघटनेच्यावतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. याप्रसंगी नवल मानधनीया, आशीष मानधनीया, विशाल खोपडे, बी.एस. पंड्या यांच्यासह औषधी विक्रेता संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.